कतरिनाशी करायचे होते लग्न, अभिनेत्रीला मानायचा बायको; ‘या’ चाहत्याने दिली विकी-कॅटला धमकी

मुंबई तक

• 10:17 AM • 25 Jul 2022

कतरिना कैफ (Katrina kaif) आणि पती विकी कौशल (Vicky kaushal) यांना जीवे मारण्याच्या धमक्या आली होती. एक व्यक्ती सोशल मीडियावर स्टार कपलला सतत धमक्या देत होती. पोलिसांनी धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला असून त्यालाही ताब्यात घेतले आहे. नवीन माहितीनुसार, मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) मनविंदर सिंग नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. मनविंदर हा स्ट्रगल करणारा अभिनेता […]

Mumbaitak
follow google news

कतरिना कैफ (Katrina kaif) आणि पती विकी कौशल (Vicky kaushal) यांना जीवे मारण्याच्या धमक्या आली होती. एक व्यक्ती सोशल मीडियावर स्टार कपलला सतत धमक्या देत होती. पोलिसांनी धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला असून त्यालाही ताब्यात घेतले आहे. नवीन माहितीनुसार, मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) मनविंदर सिंग नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे.

हे वाचलं का?

मनविंदर हा स्ट्रगल करणारा अभिनेता असल्याचे सांगितले जात आहे. मनविंदर सिंग बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफचा मोठा चाहता आहे. त्याला कतरिनासोबत लग्न करायचे होते, त्यामुळेच गेल्या काही महिन्यांपासून तो सोशल मीडियावर कतरिना आणि विकी कौशलला सतत त्रास देत होता. कतरिना आणि विकीला धमकी देणारा आरोपी मुंबईतच राहतो. पोलिसांनी आज आरोपीला अटक केली आहे. पोलीस त्या व्यक्तीची चौकशी करत आहेत.

इंस्टाग्रामवर आरोपी कतरिना कैफला मानायचा पत्नी

पोलिसांनी पकडलेल्या आरोपीचे इंस्टाग्राम अकाउंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल. या व्यक्तीने इंस्टाग्रामवर आपले नाव किंग आदित्य राजपूत VVIP असे लिहिले आहे. प्रोफाइल बायोमध्ये, व्यक्तीने स्वतः अभिनेता असल्याचे सांगितले आहे. सर्वात धक्कादायक म्हणजे या व्यक्तीने बायोमध्ये माझी गर्लफ्रेंड/वाईफ @katrinakaif असे लिहिले आहे.

एडिट केला कतरिनाच्या लग्नाचा फोटो

आरोपीच्या वेडेपणाचा तुम्ही यावरून लावू शकता की त्याने कतरिनाच्या लग्नाचा फोटो त्याच्यासोबत एडिट करून शेअर केला आहे. फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की कतरिना तिच्या लग्नाच्या पोशाखात आहे आणि विकी कौशलचा चेहरा एडिट करून आरोपीने त्याचा चेहरा लावला आहे. कॅप्शनमध्ये, कतरिना कैफच्या आयडीला टॅग करून, त्याने अभिनेत्रीसोबतच्या लग्नाबद्दल सांगितले आहे.

चाहत्यांचे आवडते कपल म्हणजे कॅट-विकी

कतरिना आणि विकीबद्दल बोलायचे झाले तर दोघेही चाहत्यांची आवडती जोडी आहे. कतरिना अलीकडेच तिचा पती आणि जवळच्या मित्रांसोबत मालदीवमध्ये वाढदिवस साजरा करून परतली आहे. कतरिना आणि विकी यांनी त्यांच्या आकर्षक केमिस्ट्रीने चाहत्यांना कपल्स गोलवाली फिलिंग देत असतात.

कतरिना कैफ आणि विकी कौशलचा कामाबद्दल बोलायचे झाले तर दोघांचे अनेक चित्रपट पाइपलाइनमध्ये आहेत. कतरिनाच्या आगामी चित्रपटांमध्ये मेरी ख्रिसमस, टायगर 3, फोन भूत, जी ले जरा यांचा समावेश आहे. दुसरीकडे, विकी कौशलचा गोविंदा नाम मेरा, द ग्रेट इंडियन फॅमिली हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

    follow whatsapp