घरी जाताना वाटेतच करण्यात आला गोळीबार; कामगाराचा मृत्यू, सराफा व्यापारी जखमी

मुंबई तक

• 05:04 AM • 22 Dec 2021

– जका खान, वाशिम दुकान बंद करून घरी निघालेल्या सराफा व्यापाऱ्यावर दोन मोटारसायकलवर आलेल्या तिघांनी गोळीबार केल्याची घटना वाशिममध्ये घडली आहे. तीन चोरांनी गोळीबाराबरोबरच चाकूनेही वार केले. यात कामगाराचा मृत्यू झाला असून, सराफाजवळचे पैसे आणि सोने घेऊन आरोपी फरार झाले. रात्री 10 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथे अंजनकर ज्वेलर्सचे मालक योगेश […]

Mumbaitak
follow google news

जका खान, वाशिम

हे वाचलं का?

दुकान बंद करून घरी निघालेल्या सराफा व्यापाऱ्यावर दोन मोटारसायकलवर आलेल्या तिघांनी गोळीबार केल्याची घटना वाशिममध्ये घडली आहे. तीन चोरांनी गोळीबाराबरोबरच चाकूनेही वार केले. यात कामगाराचा मृत्यू झाला असून, सराफाजवळचे पैसे आणि सोने घेऊन आरोपी फरार झाले. रात्री 10 वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथे अंजनकर ज्वेलर्सचे मालक योगेश अंजनकर हे दुकानातील कामगारासह दुकान बंद करून घरी जात होते. यावेळी त्यांनी काही सोन्याचे दागिणे आणि पैसेही बॅगेत घेतले होते. घरापासून काही अंतरावर अंजनकर यांना अडवण्यात आलं.

Crime: अश्लील फोटो काढून मुलींना करायचा ब्लॅकमेल, पीडित तरुणींनी ‘असा’ काढला काटा

दोन मोटारसायकलवरून आलेल्या तिघांनी योगेश अंजनकर यांना अडवत गोळीबार केला. चोरट्यांनी त्यांच्या डोळ्यात मिरची पूडही फेकली. त्यानंतर कामगार रवि वाळेकर यांच्या हातात असलेली बॅग हिसकावण्याचा प्रयत्न चोरट्यांनी सुरु केला.

रवि वाळेकर यांनी त्यांना विरोध केला. त्यामुळे चोरट्यांनी थेट चाकूने कामगार आणि व्यापारी अंजनकर यांच्यावर हल्ला केला. चाकूचे वार करण्यात आल्याने वाळेकर आणि अंजनकर जखमी झाले. त्यानंतर पैसे आणि सोन्याचे दागिणे असलेली बॅग घेऊन चोरटे पसार झाले.

अत्याचाराचा कळस! चिमुकलीच्या गळ्यावर चाकू ठेवून नराधमाने आईवर केला बलात्कार

दोन मोटारसायकलवर आलेल्या चोरट्यांनी एक मोटारसायकल घटनास्थळीच सोडली. दरम्यान, योगेश अंजनकर आणि रवि वाळेकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, रुग्णालयात भरती करण्यापूर्वीच कामगार रवि वाळेकर यांचा मृत्यू झाला होता. सराफा व्यापारी योगेश अंजनकर यांच्यावर उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी गोळीबाराच्या ठिकाणी पोलिसांनी धाव घेतली. या परिसरात कुठे सीसीटीव्ही कॅमेरा आहे का? याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. दरम्यान, चोरट्यांनी घटनास्थळी सोडली मोटारसायकलबद्दल चोरीची असल्याचं समोर आलं आहे.

    follow whatsapp