एलन मस्कने ट्विटर लोगोसाठी वापरलेला Dogecoin आहे तरी काय? जाणून घ्या

मुंबई तक

04 Apr 2023 (अपडेटेड: 04 Apr 2023, 01:36 PM)

elon musk changed twitter logo : Doge आता ट्विटरचा नवीन लोगो असणार आहे. दरम्यान हा Doge लोगो हा Dogecoin मधून आला आहे. क्रिप्टोकरन्सीमध्ये माहित असणाऱ्यांना Dogecoin ची कल्पना असणार आहे. मात्र तरीही अनेकांना Dogecoin माहिती नाही आहे, त्यामुळे चला जाणून घेऊयात.

elon musk changed twitter logo from blue bird to doge

elon musk changed twitter logo from blue bird to doge

follow google news

what is dogecoin elon musk changed twitter logo : जगभरातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती एलन मस्कने (elon musk) ट्विटर खरेदी केल्यानंतर त्याच्यामध्ये अनेक बदल केले आहे. एलन मस्कने आधी ब्लू टीकच्या नियमात बदल केला होता, त्यानंतर आता ट्विटरचा लोगोच बदलला आहे. Doge आता ट्विटरचा नवीन लोगो असणार आहे. दरम्यान हा Doge लोगो हा Dogecoin मधून आला आहे. क्रिप्टोकरन्सीमध्ये माहित असणाऱ्यांना Dogecoin ची कल्पना असणार आहे. मात्र तरीही अनेकांना Dogecoin माहिती नाही आहे, त्यामुळे चला जाणून घेऊयात. (what is dogecoin elon musk changed twitter logo from blue bird to doge)

हे वाचलं का?

एलन मस्कने (elon musk) ट्विटरच्या चिमणी लोगोला Dogeशी रिप्लेस केले आहे. मंगळवारी रात्री त्याने ट्विट करून याबाबतची अधिकृत घोषणा केली. विशेष म्हणजे हा बदल फक्त वेब वर्जनसाठी असणार आहे. मोबाईल वर्जनमध्ये चिमणीचाच लोगो दिसणार आहे.

काय आहे Doge?

Dogecoin ही एक प्रसिद्ध क्रि्प्टोकरेंसी आहेत, या करेन्सीला 2013 साली बनवले गेले होते. Dogecoin ला बिली मार्कस आणि जॅक्सन पारमरने 2013 साली लॉंच केले होते. या कॉईनमध्ये शिबा इनु डॉग (Shiba Inu Dog) चा फोटो लावण्यात आला होता. विशेष बाब म्हणजे, बिटकॉईन आणि दुसरी क्रिप्टोकरन्सीचा थट्टा करण्यासाठी Dogecoin करन्सी बनवण्यात आली होती. मात्र 2021 ला क्रिप्टोकरन्सी चर्चेत आली होती. ही चर्चा होण्यामागचं कारण देखील एलन मस्कच होता. एलन मस्क यांनी या करन्सीबाबत ट्विट करायला सुरूवात केली, आणि नागरीकांचे लक्ष त्याकडे वळले. डोगेकॉईनच्या लोगोला Doge ही म्हणतात. या डोगेच मीम्स वायरल झाल्यानंतर क्रिप्टोकरन्सीच्या कम्युनिटीचा कल त्याच्याकडे वाढला होता.

हे ही वाचा : ट्विटरची निळी चिमणी गायब, एलन मस्कने मीम डॉगीलाच बनवलं लोगो

एलन मस्कविरोधात कोर्टात केस

एलन मस्कवर (elon musk) डोगेकॉइनला प्रमोट आणि पिरामिड स्किम चालवण्याचा आरोप एका व्यक्तीने केला होता. गेल्या वर्षी हे प्रकरण मिटवण्याची अपील 31 मार्च रोजी एलन मस्कच्या वकिलाने कोर्टात केली होती. एलन मस्कने 258 अरब डॉलर देऊन या केसला कल्पनेचे काल्पनिक काम म्हटले आहे.

दरम्यान ज्या व्यक्तीने एलन मस्क (elon musk) विरोधात कोर्टात केस दाखल केली होती, त्या व्यक्तीने Dogecoin मध्ये खुप मोठी गुंतवणूक केली होती. त्यानंतर ज्यावेळेस क्रिप्टोकरन्सीचे मार्केट कोसळले, त्यावेळी याचा सर्वात जास्त फटका गुतंवणूकदारांना बसला. तक्रारदाराचे म्हणणे आहे की, त्याने Dogecoin मध्ये गुंतवणूक केल्याने पैसै गमावले होते. त्यामुळे त्याने एलन मस्कच्या टेस्ला आणि स्पेसएक्स विरूद्ध केस केली होती.

हे ही वाचा : डोनाल्ड ट्रम्प यांचे पॉर्न स्टारशी संबंध? काय आहे वाद अन् कसं समोर आलं प्रकरण?

ट्विटरची कितीला खरेदी?

एलन मस्कने (Elon Musk) गेल्याच वर्षी माइक्रोब्लॉगिंग साईट ट्विटर खरेदी केली होती. 44 अरब डॉलरमध्ये ट्विटरची ही डिल झाली होती. मस्क यांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 54.2 डॉलर प्रति शेअरच्या रेटनुसार 44 अरब डॉलरला खरेदीची ऑफर मिळाली होती. परंतू स्पॅम आणि फेक अकाऊंटमुळे त्यांनी ही डिल होल्डवर ठेवली होती.मस्क या डिलमधून माघार घेणार होते, मात्र प्रकरण कोर्टात पोहोचल्याने त्यांना ही डिल पुर्ण करावी लागली होती.

    follow whatsapp