Omicron Symptoms: ओमिक्रॉनचा संसर्ग झाल्यानंतर दिसून येेतात ही 20 लक्षणं

मुंबई तक

• 06:48 AM • 17 Jan 2022

देशात पुन्हा एकदा कोरोनाचं थैमान बघायला मिळत आहे. कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटचा शिरकाव झाल्यानंतर देशात तिसरी लाट आली. सध्या दररोज लाखो रुग्ण आढळून येत असून, ओमिक्रॉन व्हेरियंटचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्याही मोठी आहे. महत्त्वाचं म्हणजे ओमिक्रॉनच्या लक्षणांमध्ये अनेक बदल झाल्याचं समोर आलं आहे. ओमिक्रॉनचा संसर्ग झाल्यानंतर रुग्णांमध्ये 20 प्रकारची लक्षणं आढळून येतात. ब्रिटनमधील ZOE कोरोना अभ्यासात […]

Mumbaitak
follow google news

देशात पुन्हा एकदा कोरोनाचं थैमान बघायला मिळत आहे. कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटचा शिरकाव झाल्यानंतर देशात तिसरी लाट आली. सध्या दररोज लाखो रुग्ण आढळून येत असून, ओमिक्रॉन व्हेरियंटचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्याही मोठी आहे. महत्त्वाचं म्हणजे ओमिक्रॉनच्या लक्षणांमध्ये अनेक बदल झाल्याचं समोर आलं आहे. ओमिक्रॉनचा संसर्ग झाल्यानंतर रुग्णांमध्ये 20 प्रकारची लक्षणं आढळून येतात.

हे वाचलं का?

ब्रिटनमधील ZOE कोरोना अभ्यासात ओमिक्रॉनच्या 20 लक्षणांबद्दल माहिती देण्यात आली आहे. ओमिक्रॉनचा संसर्ग झालेल्या प्रत्येक रुग्णांमध्ये वेगवेगळी लक्षणं आढळून येतात, असं या अभ्यासातून समोर आलं आहे. ही लक्षणं किती कालावधीपर्यंत दिसून येतात, याबद्दलही माहिती देण्यात आली आहे.

ओमिक्रॉनची 20 लक्षणं

1) डोकेदुखी

2) नाकातून सतत पाणी येणं

3) अशक्तपणा

4) शिंका येणं

5) घशामध्ये खवखवणे

6) सारखा खोकला येणे

7) आवाज कर्कश येणे

8) थंडी जाणवणे

9) ताप

10) चक्कर येणे

11) ब्रेन फॉग (विचार प्रक्रियेची गती मंदावणे)

12) सुगंध बदलणे

13) डोळे जळजळणे

14) नसांमध्ये त्रास होणे

15) भूक न लागणे

16) वास न येणे

17) छातीत वेदना होणे

18) ग्रंथीवर सूज येणे

19) त्वचेला तडे जाणे

20) शक्तीहीन वाटणे

ओमिक्रॉनची लक्षणं किती काळ राहतात?

ओमिक्रॉन व्हेरियंटचा संसर्ग झाल्यानंतर 20 प्रकारची लक्षणं जाणवतात. आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांच्या माहितीनुसार ओमिक्रॉनची लक्षणं डेल्टा व्हेरियंटच्या तुलनेत पटकन दिसून येतात. त्याचबरोबर ही लक्षणं जाणवण्याचा कालावधी कमी असतो. ओमिक्रॉनचा संसर्ग झाल्यानंतर 2 ते 5 दिवसांनंतर ही लक्षणं जाणवू लागतात. साधारणतः 5 दिवसांपर्यंत ही लक्षणं दिसून येतात.

ब्रिटिश साथरोग टीमच्या मते डेल्टा व्हेरियंटच्या तुलनेत ओमिक्रॉनची लक्षणं कमी दिवस जाणवतात. रुग्णामध्ये पहिल्या आठवडाभरच लक्षणं दिसून येतात. 5 दिवसांनंतर कोरोना चाचणी निगेटिव्ह आली, तर लक्षणं येऊन गेली असा त्याचा अर्थ होतो. ओमिक्रॉनची लक्षणं जितक्या पटकन जाणवू लागतात, तितक्याच गतीने ती कमी होत जातात. ओमिक्रॉनची लक्षणं जाणवण्याचा आणि शरीरात राहण्याचा कालावधी 3 ते 5 दिवसांचा असतो. ज्यांनी लस घेतली आहे, त्या लोकांना सौम्य स्वरूपाची लक्षणं जाणवतात. तर ज्यांनी लस घेतलेली नाही, त्यांना तीव्र स्वरूपाची लक्षणं जाणवत असल्याचं अभ्यासातून समोर आलं आहे.

    follow whatsapp