राणेंचा उद्धव ठाकरेंना टोला! “२० पावलं चालल्यावर दमणारे कशाला आव्हानं देत आहेत?”

मुंबई तक

• 12:48 PM • 14 Oct 2022

दक्षिण मुंबईत भाजपचाच खासदार निवडून येणार असा विश्वास केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केला आहे. त्यानंतर नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी अंधेरी पोटनिवडणुकीत आमचाच विजय होईल तसंच महापालिकाही आम्हीच जिंकू असं सांगत असताना नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली. उद्धव ठाकरेंबाबत काय म्हणाले नारायण राणे? उद्धव […]

Mumbaitak
follow google news

दक्षिण मुंबईत भाजपचाच खासदार निवडून येणार असा विश्वास केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केला आहे. त्यानंतर नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी अंधेरी पोटनिवडणुकीत आमचाच विजय होईल तसंच महापालिकाही आम्हीच जिंकू असं सांगत असताना नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली.

हे वाचलं का?

उद्धव ठाकरेंबाबत काय म्हणाले नारायण राणे?

उद्धव ठाकरे गटाने आज मुंबईत शक्तीप्रदर्शन केलं, महाविकास आघाडीचे नेते सोबत आले होते. यावर प्रश्न विचारला असता नारायण राणे म्हणाले सगळे एकत्र आले म्हणजे शक्ती प्रदर्शन म्हणत नाहीत. जे कमकुवत असतात ते एकत्र येऊन दाखवतात आम्ही सोबत आहोत. उद्धव ठाकरेंना भाषा सुधरायला सांगा. सरकार पाडून दाखवा म्हणत होते आम्ही पाडलं सरकार. आता म्हणत आहेत मैदानात या. मैदानात आम्ही येतो त्याला म्हणावं तू मातोश्री सोड. मातोश्री सोडून जरा मैदानं कशी असतात, रस्ता कसा असतो ते बघ. उगाच बडबड करू नको असं नारायण राणेंनी म्हटलं आहे. शेंबड्या मुलांचे प्रश्न विचारू नका असं म्हणत आदित्य ठाकरेंच्या प्रश्नावरही नारायण राणेंनी टोला लगावला.

उद्धव ठाकरे गटाचा एकही खासदार मुंबईत निवडून येणार नाही

उद्धव ठाकरे गटाचा एकही खासदार मुंबईत निवडून येणार नाही याची आम्ही काळजी घेऊ असंही नारायण राणेंनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर आज रमेश लटके असते तर शिंदे गटात असते असंही नारायण राणेंनी म्हटलं आहे. डॉक्टरांनी उद्धव ठाकरेंना सांगितलं आहे २० पावलं चाला. २१ पावलं चालले तर यांना दम लागतो हे कसली हिंमत वगैरे काढत आहेत? आज उद्धव ठाकरे गटाने केलेलं शक्तीप्रदर्शन म्हणजे एक ना धड भाराभर चिंध्या असं आहे असं म्हणत नारायण राणेंनी टोलेबाजी केली.

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?

छगन भुजबळ यांचा ७५ वा वाढदिवस साजरा झाला. त्यावेळी मुंबईतल्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे आले होते. या कार्यक्रमात उद्धव ठाकरेंनी जोरदार फटकेबाजी केली. हिंमत असेल तर समोर या मैदानात या. मी पण वाट पाहतो आहे की लढाई कधी सुरू होते आहे. असं म्हणत शिंदे गटाला आव्हान दिलं होतं. तसंच भाजपवरही जोरदार टीका केली होती. उद्धव ठाकरेंच्या याच आव्हानाला आज नारायण राणे यांनी उत्तर दिलं आहे.

    follow whatsapp