राजकारणात ट्विस्ट, ओमराजे निंबाळकर यांनी उद्धव ठाकरे यांची शिवसेना सोडली?

मुंबई तक

17 Jun 2026 (अपडेटेड: 17 Jun 2026, 07:58 PM)

ऑपरेशन टायगर यशस्वी ठरल्यातच जमा आहे. यापैकी सर्वाधिक चर्चेत असलेलं नाव म्हणजे ओमराजे निंबाळकर होय. ओमराजे निंबाळकर हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याच्या चर्चेनं आता मतदारांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

Google CTA

Operation Tiger : उद्धव ठाकरेंच्या शिवसेना पक्षाचे काही खासदार हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाण्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. अधिकृतरित्या जरी खासदारांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला नसला तरीही ऑपरेशन टायगर यशस्वी ठरल्यातच जमा आहे. यापैकी सर्वाधिक चर्चेत असलेलं नाव म्हणजे ओमराजे निंबाळकर होय. ओमराजे निंबाळकर हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याच्या चर्चेनं आता मतदारांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. 

धाराशिवमधील झालेल्या खासदारकीच्या लढाईत मतदारांनी ओमराजे निंबाळकर यांना भरघोस मतांनी विजयी केलं. मात्र, आता तेच ओमराजेंवर एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याची वेळ आली अशा चर्चा आहे. या चर्चेमुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात नाराजीचा सूर आहे. ओमराजे निंबाळकर अधिकृतरित्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले, तर हा मोठा भावनिकदृष्ट्या धक्का मानला जातोय.