NCP-SP: भाग्यश्री आत्रामांचा भावूक निर्णय, वडिलांची साथ सोडून का घेतली तुतारी हाती?

Bhagyashree Atram: भाग्यश्री आत्राम यांनी थेट शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत आपल्या वडिलांना मोठा धक्का दिला आहे.

मुंबई तक

13 Sep 2024 (अपडेटेड: 13 Sep 2024, 09:35 AM)

follow google news

NCP-SP: गडचिरोली: वडीलांची भाजपशी जवळीक पसंत पडली नसल्याने भाग्यश्री आत्रामांनी वेगळा निर्णय घेतला आहे. मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांची कन्या, भाग्यश्री आत्राम, यांनी अहेरी येथे शरद पवारांच्या गटात पक्षप्रवेश केला आहे. त्यांनी यावेळी वडिलांविरोधात त्यांच्या मतदारसंघात व्यापक पातळीवर काम करण्याची घोषणा केली. या क्षेत्रात त्यांनी सुप्रिया सुळेंसह काम करण्याचा अनुभव घेतला आहे.

    follow whatsapp