धनंजय मुंडे यांच्या कार्यक्रमात अभिनेत्री रश्मिका मंदानाची विशेष उपस्थिती

धनंजय मुंडे यांच्या गणेश महोत्सवाच्या कार्यक्रमात अभिनेत्री रश्मिका मंदाना उपस्थित होती. तिच्या येण्याने चाहत्यांनी आनंद साजरा केला.

मुंबई तक

08 Sep 2024 (अपडेटेड: 08 Sep 2024, 05:23 PM)

follow google news

Rashmika Mandhana Latest Video :  मंत्री धनंजय मुंडे यांच्या नाथ प्रतिष्ठानच्या वैद्यनाथ सार्वजनिक गणेश महोत्सवास अभिनेत्री रश्मिका मंदानाने उपस्थिती दर्शवली. अभिनेत्री रश्मिका मंदानाची एन्ट्री होताच चाहत्यांनी जोरदार जल्लोष केला. अभिनेत्री रश्मिका मंदानानेही नृत्य अदा दाखवत चाहत्यांनी मनं जिंकली. नॅशनल क्रश परळीत आल्याचं सांगत धनंजय मुंडेंनी रश्मिका मंदानाचं स्वागत केलं. महाराष्ट्रातील या कार्यक्रमात रश्मिका मंदानाची उपस्थिती आणि अदांनी परळीकरांची मनं जिंकली हे विशेष होतं. दिसायला सुंदर आणि नृत्यकलेतही तगडी, रश्मिका मंदानाने परळीकरांना खूश केलं.

    follow whatsapp