जालन्यात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात गोंधळ, पोलिसांचा लाठीचार्ज

जालन्यात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात मोठा गोंधळ झाला आहे. पोलिसांनी लाठीचार्ज करून हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांना रोखलं.

मुंबई तक

31 Aug 2024 (अपडेटेड: 31 Aug 2024, 11:10 AM)

follow google news

Gautami Patil Viral Video : जालन्यात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात तुफान राडा झाल्याचं पाहायला मिळालं. दहीहंडी उत्सवानिमित्ताने जालन्यात गौतम पाटीलच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. तुफान गर्दीमुळे छतावर बसून चाहत्यांनी गौतमी पाटीलच्या अदा पाहिल्या. या कार्यक्रमादरम्यान काही तरुणांनी हुल्लडबाजी केल्यामुळे पोलिसांनी लाठीचार्जही केला. त्यामुळे कार्यक्रमात मोठा गोंधळ झाला होता.

    follow whatsapp