राज्याची पर्यटन राजधानी असलेलं औरंगाबाद 11 ऑक्टोबर रोजी खूनाच्या घटनेनं हादरलं. शहरातील मौलाना आझाद महाविद्यालयात प्राध्यापक असलेल्या राजन शिंदे यांची राहत्या घरात अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. हत्या कुणी आणि कशामुळे केली? याचा छडा लावण्याचे प्रयत्न पोलिसांकडून मागील आठ दिवसांपासून सुरू होते. अखेर त्याला यश मिळालं असून, एका अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. महत्त्वाचं म्हणजे हत्येसाठी वापरण्यात आल्या गोष्टी पोलिसांना सापडल्या आहेत. प्रा. राजन शिंदे यांची 11 ऑक्टोबर रोजी डोक्यावर वार केल्यानंतर गळा व हाताच्या नसा कापून हत्या करण्यात आली होती. राजन शिंदे यांच्या हत्येनं शहरात खळबळ उडाली होती. मात्र, राजन शिंदे यांच्या हत्येनंतर कुणी व का हत्या केली असेल, यासारखे अनेक प्रश्न निर्माण झाले होते.
प्रा. राजन शिंदे खून प्रकरणाचा औरंगाबाद पोलिसांनी कसा केला उलगडा?
मुंबई तक
19 Oct 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:34 PM)
राज्याची पर्यटन राजधानी असलेलं औरंगाबाद 11 ऑक्टोबर रोजी खूनाच्या घटनेनं हादरलं. शहरातील मौलाना आझाद महाविद्यालयात प्राध्यापक असलेल्या राजन शिंदे यांची राहत्या घरात अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. हत्या कुणी आणि कशामुळे केली? याचा छडा लावण्याचे प्रयत्न पोलिसांकडून मागील आठ दिवसांपासून सुरू होते. अखेर त्याला यश मिळालं असून, एका अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. […]
ADVERTISEMENT



