Manoj Jarange Patil यांचं उपोषण सोडताना देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र, एकेरीत हल्लाबोल

मुंबई तक

30 Jul 2024 (अपडेटेड: 30 Jul 2024, 02:13 PM)

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन स्थगित करताना देवेंद्र फडणवीसांवर तीव्र टीका केलीय आणि त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

Google CTA

मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन स्थगित केलंय. त्यांनी आंदोलन स्थगित करताना देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप करत हल्लाबोल केलाय. एकेरी भाषेत बोलत त्यांनी फडणवीसांवर टीका केलीय. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या अडचणी आता वाढण्याची शक्यता आहे. 2013 मधल्या एका जुन्या प्रकरणामुळे जरांगेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. पुण्यातील एका नाट्यनिर्मात्याने मनोज जरांगे यांच्यावर फसवणूक केल्याचा आरोप केला असून पुण्यातील कोथरूड पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हाही दाखल झालाय. यावर आता मनोज जरांगेंनी प्रतिक्रिया दिलीय.