नवी दिल्ली: नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट (NEET-UG) २०२६ च्या परीक्षेत पेपर फुटीच्या गंभीर आरोपांमुळे २२ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. ही परीक्षा ३ मे २०२६ रोजी देशभरात झाली होती. राजस्थानमधील सिकर येथे कोचिंग सेंटरमध्ये 'गेस पेपर' प्रसारित झाला, ज्यात परीक्षेच्या अंतिम प्रश्नपत्रिकेतील 100 हून अधिक प्रश्न जुळले. यामुळे राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (NTA) ने 12 मे 2026 रोजी संपूर्ण परीक्षा रद्द केली आणि पुन्हा परीक्षा (re-exam) 21 जून 2026रोजी OMR स्वरूपात घेण्याची घोषणा केली. पण त्यानंतर
ADVERTISEMENT
नीट पेपर फुटी ( NEET Paper Leak ) प्रकरणात 22 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले. सीबीआयने ( CBI Investigation ) आरोपींच्या सोन्यासह अनेक वस्तू जप्त केल्या. 2024 च्या परीक्षा प्रक्रियेतील त्रुटींचा उल्लेख करत सर्वोच्च न्यायालयानेही ( Supreme Court ) NTA ला सुनावलं. उच्चस्तरीय समितीनं सांगितलेल्या शिफारसी का लागू झालेल्या नाहीत असा प्रश्न त्यांनी विचारला. डिजिटल प्रश्नपत्रिका, डेटा सुरक्षा आणि परीक्षा प्रक्रियेतील सुधारणा या मुख्य मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत का केलं गेलं नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
ADVERTISEMENT


