Pune Crime News : मध्यरात्री गाड्यांची तोडफोड, पुण्यातील सिंहगड रोड परिसरात दहशत

मुंबई तक

• 03:43 PM • 13 Aug 2026

पुण्यात पुन्हा एकदा गाड्यांची तोडफोड झाल्याचं समोर आलं आहे. एका तरुणाने हातात कोयता घेऊन मध्यरात्री गाड्यांची तोडफोड केली. यामध्ये अनेक गाड्यांचं नुकसान झालं.

Google CTA

Pune Crime : पुण्यात गुन्हेगारांचा धुमाकूळ काही थांबायचं नाव घेत नाहीये. शहरात पुन्हा एकदा गाड्यांची तोडफोड झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास एका तरुणाने हातात उघडा कोयता घेऊन रस्त्यावरील उभ्या असलेल्या अनेक वाहनांची सर्रास तोडफोड केली. या तोडफोडीत चारचाकी आणि दुचाकी गाड्यांचे मोठे नुकसान झाले असून, अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात प्रचंड घबराट पसरली आहे.

हा संपूर्ण थरार जवळच असलेल्या सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यामध्ये कैद झाला असून, या घटनेमुळे पुण्यात पुन्हा एकदा दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक उरला आहे की नाही, असा सवाल आता स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. याप्रकरणी पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तोडफोड करणाऱ्या संबंधित तरुणाचा शोध घेत आहेत.