Rahul Narvekar: …तर भरत गोगावले पुन्हा प्रतोद होणार?, राहुल नार्वेकरांनी केलं मोठं विधान

मुंबई तक

16 May 2023 (अपडेटेड: 20 Jul 2023, 08:04 AM)

भरत गोगावले यांची प्रतोद पदी पुन्हा निवड होऊ शकते का? याबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अत्यंत महत्त्वाचं असं वक्तव्य केलं आहे. जाणून घ्या नार्वेकर नेमकं काय म्हणाले.

Google CTA

हे वाचलं का?

सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) घटनापीठाने गुरुवारी (11 मे) उद्धव ठाकरे गट आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या विविध याचिका 7 जणांच्या घटनापीठाकडे पाठवलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रात वर्षभरापासून सुरू असलेली राजकीय उलथापालथ काही काळासाठी थांबली असली तरी सर्वोच्च न्यायालयाने राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्षांवर भाष्य करताना त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तसेच, सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, उद्धव ठाकरे बहुमत चाचणीला सामोरे गेले नाही, त्यामुळे त्यांचे सरकार पुनर्स्थापित करता येणार नाही. सुप्रीम कोर्टाच्या निकालावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी लंडनहून आल्यावर सविस्तर उत्तर दिलं.

Rahul Narvekar on bharat gogawale chife whip on shiv sena Supreme Court Shiv Sena Nikal