वरूण सरदेसाई यांच्यासमोर तगडं आव्हान! वांद्रे पूर्वची निवडणूक कोण जिंकणार? पाहा VIDEO

वांद्रे पूर्व मतदारसंघातून वरूण सरदेसाई आणि झिशान सिद्दीकी यांच्यात विधानसभा निवडणुकीसाठी चुरशीची लढत होऊ शकते.

मुंबई तक

25 Oct 2024 (अपडेटेड: 25 Oct 2024, 09:51 PM)

follow google news

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाने वांद्रे पूर्व मतदारसंघातून वरुण सरदेसाई यांना उमेदवारी दिली आहे. या निवडणुकीतून वरूण सरदेसाई यांना जबरदस्त आव्हान असणार आहे. कारण झिशान सिद्दिकी देखील याच मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत. काही दिवसांपूर्वी झिशान यांचे वडील बाब सिद्दीकी यांची हत्या झाल्यानं खळबळ उडाली होती. आता सिद्दीकींच्या हत्येच्या घटनेमुळं  झिशान यांना त्यांच्या मतदारसंघात सहानुभूती मिळेल असा कयास लावला जात आहे. तर दुसरीकडे वरुण सरदेसाई निवडणुकीचया रिंगणात उतरणार आहे, त्यामुळे या मतदारसंघाचा निकाला कुणाच्या बाजूने लागतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

    follow whatsapp