Video : सुप्रिया सुळे यांचं भाषण सूरू होताच 'जय श्रीराम'च्या घोषणा, पुढे काय घडलं?

Supriya Sule : सुप्रिया सुळे यांच्या भाषणादरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी जय श्रीरामच्या घोषणाबाजी दिल्याची घटना घडली आहे. पुण्यातील एका कार्यक्रमात सुप्रिया सुळे भाषण करण्यासाठी माईकजवळ आल्या असताना भाजप कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.

मुंबई तक

21 Sep 2024 (अपडेटेड: 21 Sep 2024, 09:54 PM)

follow google news

Supriya Sule : सुप्रिया सुळे यांच्या भाषणादरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी जय श्रीरामच्या घोषणाबाजी दिल्याची घटना घडली आहे. पुण्यातील एका कार्यक्रमात सुप्रिया सुळे भाषण करण्यासाठी माईकजवळ आल्या असताना भाजप कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. या घटनेनंतर व्यासपीठावरील देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी आणि दिलीप वळसे पाटील यांनी कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले. 

खासदार सुप्रिया सुळे यांचे भाषण सुरु असताना जोरदार घोषणाबाजी झाली. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्या. त्यानंतरही सुप्रिया सुळे यांनी आपले भाषण सुरुच ठेवले. भाजप कार्यकर्त्यांकडून ‘जय श्रीराम’च्या दिल्या. तसेच ‘देवेंद्र फडणवीस आगे बढो’ अशा प्रकारचे देण्यात घोषणा दिल्या. शेवटी चंद्रकांत पाटील यांननी उभे राहून कार्यकर्त्यांना शांत करावा लागले.
 

    follow whatsapp