सोलापूरमध्ये राजकारण तापलं, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 'हे' उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

सोलापूर जिल्ह्यातील राजकारण, तसेच मोहिते पाटील घराण्याच्या नेतृत्वाखालील स्थानिक पक्ष आणि त्यांच्या भूमिकांचा घेतलेला हा थोडक्यात आढावा.

मुंबई तक

06 Jun 2026 (अपडेटेड: 06 Jun 2026, 07:13 PM)

follow google news

Solapur Vidhan Parishad Election : सोलापूरमध्ये महायुतीकडून भाजपचे राजेंद्र राऊत तर महाविकास आघाडीकडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे वसंतराव देशमुख हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. भाजपचं संख्याबळ अधिकचं असलं तरीही खासदार धौर्यशील मोहिते पाटील यांनी अदृश्य मतांचा दावा करत भाजपच्या विरोधात एक आव्हानं उभं करण्याचा प्रयत्न केलाय. दरम्यान, महाविकास आघाडीच्या वाटेत स्वकीयांनीच काटे विखुरल्याची माहिती मोहिते पाटील यांना पक्षातील आमदारांचीच समजूत काढावी लागणार आहे. 

हे वाचलं का?

सोलापूरमधील राजकारणाचा विचार केल्यास मोहिते पाटील यांच्या आजच्या भूमिकेवर मोठी चर्चा आहे. भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षादरम्यानचा संबंध आणि स्थानिक नेत्यांच्या बदलेल्या भूमिकांमुळे राजकीय परिस्थिती गुंतागुंतीची निर्माण झाली आहे. अनेक लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोहिते पाटील यांची भूमिका कशा पद्धतीने वेगळी राहिलीये, ते जाणून घेणं गरजेचंय. 

राजकीय पक्षांतील गटबाजीमुळे स्थानिक प्रशासनावरही मोठा परिणाम होताना दिसतो. स्थानिक नेते, काही कार्यकर्ते यांचं मत बदलत आहेत, नंतर ते कोणत्या दिशेने वळेल ही येणारी वेळ आणि काळ ठरवेल. या सर्वच राजकीय घडामोडींचा समाजावर प्रचंड असा परिणाम होण्याची शक्यता आहे.