कार्यकर्ते धाय मोकलून रडले ,अजितदादांना अखेरचा निरोप देताना लाखोंचा जनसागर हळहळला
मुंबई तक
29 Jan 2026 (अपडेटेड: 29 Jan 2026, 11:46 AM)
Ajit Pawar funeral : अजित पवार यांचे निधन शरद पवार यांच्यासाठी मोठा वैयक्तिक धक्का मानला जात असून, त्यांचा खंबीर आधार हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
ADVERTISEMENT

1/9
मागील अनेक वर्षांपासून आपल्या ठाम नेतृत्वशैलीने आणि वेगवान कामकाजामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात केंद्रस्थानी राहिलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी बारामती येथे झालेल्या अपघातात निधन झाले.

2/9
जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी आयोजित सभांसाठी अजित पवार काल बारामतीत येणार होते.
ADVERTISEMENT

3/9
मात्र, बारामती विमानतळावर उतरत असताना त्यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. धावपट्टीवर लँडिंगदरम्यान विमान कोसळून मोठा स्फोट झाला. या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह विमानातील एकूण सहा जणांचा जागीच मृत्यू झाला.

4/9
अजित पवार यांच्या अकाली जाण्याने राज्याच्या राजकारणाला जबर धक्का बसला असून, संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे.
ADVERTISEMENT

5/9
त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्राने एक प्रभावी नेतृत्व गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.

6/9
अजित पवार यांच्यावर गुरुवारी बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत.
ADVERTISEMENT

7/9
या अंत्यदर्शनासाठी राज्यासह देशभरातील अनेक प्रमुख नेते बारामतीत दाखल झाले.

8/9
अजित पवार यांचे निधन शरद पवार यांच्यासाठी मोठा वैयक्तिक धक्का मानला जात असून, त्यांचा खंबीर आधार हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

9/9
या कठीण प्रसंगी त्यांना धीर देण्यासाठी सर्वपक्षीय नेते बारामतीत उपस्थित राहत आहेत.
ADVERTISEMENT










