गुणरत्न सदावर्तेंना राजकारण भोवलं; दोन वर्ष करता येणार नाही वकिली

मुंबई तक

28 Mar 2023 (अपडेटेड: 28 Mar 2023, 10:35 AM)

अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते (Adv.  Gunaratna Sadavarte) यांची वकिली सनद 2 वर्षांसाठी रद्द झाली आहे. अ‍ॅड. सुशील मंचरकर यांच्या तक्रारीनंतर बार काऊंसिल ऑफ महाराष्ट्रने ही कारवाई केली आहे.

Advocate Charter of Gunaratna Sadavarte has been canceled for 2 years

Advocate Charter of Gunaratna Sadavarte has been canceled for 2 years

follow google news

Adv.  Gunaratna Sadavarte news :

हे वाचलं का?

मुंबई : अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते (Adv. Gunaratna Sadavarte) यांची वकिली सनद 2 वर्षांसाठी रद्द झाली आहे. अ‍ॅड. सुशील मंचरकर यांच्या तक्रारीनंतर बार काऊंसिल ऑफ महाराष्ट्रने ही कारवाई केली आहे. याबाबत बार काऊंसिल ऑफ इंडियालाही पत्राद्वारे कळविण्यात आलं आहे. या कारवाईनंतर आता सदावर्ते यांना देशातील कोणत्याही न्यायालयात पुढील 2 वर्ष वकिली करता येणार नाही. दरम्यान, सदावर्ते यांनी मात्र कोणतीही सुनावणी झाली नसून असा कोणताही आदेश नसल्याचं म्हटलं आहे. (Advocate Charter of Adv.  Gunaratna Sadavarte has been canceled for 2 years)

काय आहेत सदावर्ते यांच्यावर आरोप?

अ‍ॅड. सुशील मंचरकर यांनी बार काऊंसिल ऑफ महाराष्ट्रकडे याबाबत तक्रार दाखल केली होती. यात सदावर्ते यांच्यावर पेशाने वकील असतानाही सामाजिक पातळीवर वकिलांच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. एसटी आंदोलनात वकिलांचा ड्रेस परिधान करून सहभाग घेणं, पाठिंबा देणं, बैठका घेणं अशा बार काऊंसिल ऑफ इंडियाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचं या तक्रारीत म्हटलं होतं. त्यानंतर 7 फेब्रुवारी रोजी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्रने सदावर्ते यांना नोटीस बजावून शिस्तभंगाची कारवाई सुरू केली होती. मात्र ही कारवाई राजकीय हेतून प्रेरित आहे, असा दावा करत या कारवाईविरोधात सदावर्तेंनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

हेही वाचा : Savarkar row: शरद पवार उद्धव ठाकरेंच्या बाजूने, राहुल गांधींना सुनावलं!

काय म्हणाले होते उच्च न्यायालय?

सदावर्ते यांनी उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली होती. यावेळी त्यांनी बार कौन्सिलवर आरोपांचा पाढा वाचला. त्यावर संतप्त झालेल्या न्यायालयाने सदावर्तेंना जोरदार शब्दात फटकारलं होतं. तुमच्याविरोधातील तक्रार राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा दावा केला म्हणून तुम्हाला विशेष वागणूक देणार नाही. प्रथमदर्शनी महाराष्ट्र बार कौन्सिलच्या नोटिशीमध्ये काही चुकीचे दिसून येत नाही. अशा स्थितीत आम्ही तुम्हाला बार कौन्सिलविरोधात चुकीचा प्रचार करू देणार नाही, असं खंडपीठाने सदावर्ते यांना बजावलं होतं.

हेही वाचा : सावरकरांवरुन राजकारण तापलं; ठाकरेंकडून काँग्रेसच्या ‘डिनर’वर बहिष्कार

एसटी आंदोलनात सदावर्तेंचा सहभाग :

गत वर्षी राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी संप पुकारला होता. सुरुवातील भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर आणि रयत क्रांती संघटनचे सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झालं. पण काही दिवसात राज्य सरकारकडून काही मागण्या मान्य करुन घेत त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला तात्पुरती स्थगिती देत असल्याचं जाहीर केलं. मात्र त्यानंतरही एसटी कर्मचाऱ्यांनी हे आंदोनल चालूच ठेवण्याचा निर्णय घेतला. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांना हे आंदोलन पुढे चालू ठेवायचं असेल तर आम्ही त्यांच्या सोबत आहोत असं म्हणतं या आंदोलनाची सुत्र सदावर्तेंनी हातात घेतली.

    follow whatsapp