‘BJP चं चिन्ह राम असतं…’, जितेंद्र आव्हाडांनी रामावरून पुन्हा डिवचलं

मुंबई तक

• 03:04 PM • 17 Jan 2024

राम शाकाहारी होता की मासांहारी असा सवाल करून नव्या वादाला सुरुवात केलेल्या आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा एकदा भाजपला डिवचलं आहे. निवडणूक आयोगाने देवाचा पक्षचिन्ह वापर करायचा नाही म्हणून अटी व नियम केल्यामुळेच त्यांनी भाजपचं चिन्हं म्हणून राम वापरला नाही नाही तर त्यांनी कमळ काढून रामाचं चिन्ह वापरलं असतं असा टोला आव्हाडांनी भाजपला लगावला आहे.

bjp should have put a picture of Rama on its political party symbol criticized mla Jitendra Awad

bjp should have put a picture of Rama on its political party symbol criticized mla Jitendra Awad

follow google news

Jitendra Awhad : शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काही दिवसांपूर्वी राम हा शाकाहारी की मासाहारी होता यावरून मोठा वाद निर्माण केला होता. त्यावरून आरोप-प्रत्यारोपही झाले होते. मात्र आता पुन्हा एकदा जितेंद्र आव्हाड यांनी रामाच्या विषयावरून भाजपवर (BJP) निशाणा साधला आहे. भाजपच्या हाता असते तर त्यांनी रामाचाच पक्षचिन्ह म्हणून वापर केला असता असा घणाघात जितेंद्र आव्हाड यांनी भाजपवर केला आहे.

हे वाचलं का?

कमळ काढून राम लावले असते

जितेंद्र आव्हाड यांनी भाजपवर टीका करताना म्हणाले की, भाजपने रामावर मालकी हक्का दाखवू नये. मात्र त्यांच्या हातात असते तर त्यांनी रामालाच आपले पक्ष चिन्हे केले असते. त्यांनी आपल्या पक्षाच्या झेंड्यावर कमळ काढून रामाचेच छायाचित्र लावले असते असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

देवाचं पक्षचिन्हं

राम मंदिराच्या मुद्यावरून भाजपवर टीका करताना त्यांनी म्हटले की, निवडणूक आयोगाने राजकीय पक्षाच्या चिन्हाबाबत काही नियण अटी लावलेल्या आहेत. देवाचे पक्षचिन्ह म्हणून वापरण्यावरही मनाई करण्यात आली आहे, नाही तर यांनी अजिबात मागेपुढं पाहिलं नसतं अशीही त्यांच्यावर त्यांनी टीका केली आहे.

हे ही वाचा >> ‘मराठा समाजाचे 8 मुख्यमंत्री झाले पण एकानेही…’, भाजप आमदाराचं मोठं विधान

पूजा करून प्रसाद वाटतील

राम मंदिराच्या मुद्यावरून गेल्या कित्येक निवडणूक लढविल्या गेल्या. त्यातच आता महिना-दीड महिन्यानंतर निवडणुका जाहीर होणार आहेत. त्यामुळे भाजपचे नेते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक पूजा करून प्रसाद वाटत बाहेर पडणार आहेत. त्याचवेळी ते रामाचे कुठले तरी पुस्तक आणतील आणि तेही घराघरामध्ये वाटत फिरतील व देशामध्ये धर्माचे वातावरण तयार करती असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला आहे. या त्यांच्या टीकेमुळे हा वाद आणखी चिघळणार असल्याचे दिसून येते आहे.

मंदिर वही बनाएंगे

आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राम मंदिराच्या पायाभरणीवरून भाजपला घेरले आहे. त्यांनी यावेळी त्यांनी सांगितले की, राजीव गांधी यांनी राम मंदिराची पायाभरणी केली होती. मात् इतिहासात पुन्हा पायाभरणी होत नाही हे भाजपला कोण सांगणार असा सवालही त्यांनी उपस्थित केला. यावेळी त्यांनी भाजपला टोला लगावत म्हणाले भाजपवाले फक्त मंदिर वही बनाएंगे म्हणतात मात्र जगह नहीं बताएंगे ही नीती भाजपकडून अवलंबविले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

    follow whatsapp