Manoj Jarange : “तुमची मस्ती…”, तानाजी सावंतांवर जरांगे भडकले, काय घडलं?

भागवत हिरेकर

09 Nov 2023 (अपडेटेड: 09 Nov 2023, 07:48 AM)

Manoj Jarange Tanaji sawant : मराठा आरक्षण मुद्द्यावर तानाजी सावंतांनी केलेल्या विधानाने मनोज जरांगे पाटील संतापले. पैशांची मस्ती तिकडेच दाखवा, असे जरांगे सावंताना म्हणाले.

Manoj Jarange Patil Hits out at Tanaji Sawant on the issue of maratha reservation

Manoj Jarange Patil Hits out at Tanaji Sawant on the issue of maratha reservation

follow google news

Maratha Reservation Manoj Jarange Patil Tanaji Sawant : मराठा आरक्षणाच्या मागणीने जोर धरलाय. मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला कोंडीत पकडलं आहे. यावरून आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी टीका केली. नाव न घेता जरांगेंना लक्ष्य केलं. त्यांनी केलेल्या विधानानंतर जरांगेंच्याही संतापाचा कडेलोट झाला आणि सावंतांना तुमची पैशांची मस्ती तिकडेच दाखवा म्हणत सुनावलं.

हे वाचलं का?

तानाजी सावंताच्या विधानावर बोलताना जरांगे पाटील म्हणाले, “ते काय बोलले मी ऐकलं नाही. पण, त्यांना नक्की कसलं वादळ दिसलं, हे मला माहित नाही. मराठ्यांच्या लेकरांचं वाटोळं होतंय, हे खरं आहे. त्याला कुणी वादळ समजत असतील आणि त्याबद्दल असं बोलत असतील तर ही मराठा समाजासाठी मोठी शोकांतिका आहे. मराठा नेत्यांना समाजाविषयी प्रेम असलं पाहिजे. त्यांनी एकदा गोरगरिबांच्या घरात जाऊन बघावं. त्यांच्या अडचणी, वेदना काय असतात, हे त्यांना कळेल.”

मराठ्यांना वेड्यात काढू नका

“आरक्षण कसं द्यायचं ते सरकारला कळतं. तुम्ही ज्ञान पाजळण्याची गरज नाही. टिकणारं आरक्षण द्यायचं की नाही, हे सरकारला कळतं आणि आरक्षण घ्यायचं की नाही हे मराठ्यांना कळतं. मराठ्यांना वेड्यात काढून स्वतःला खूप शहाणे दाखवायची गरज नाही”, अशा शब्दात जरांगेंनी सावंतांच्या विधानाचा समाचार घेतला.

हे ही वाचा >> 20 लाखाने घेतला एकाच कुटुंबातील सात जणांचा जीव, बंद घरात काय घडलं?

“गोरगरीब मराठ्यांच्या जीवावर त्यांनी पैसे कमावलेत. आता त्याच पैशाची त्यांना मस्ती आली आहे. ही पैशाची मस्ती तुमच्याकडेच ठेवायची. तुमची मस्ती तिकडेच दाखवायची. आरक्षण का टिकलं नाही, याचा शोध तुम्हीच घ्या. उगीच मस्तीतल्या गप्पा कशाला मारायच्या”, अशा शब्दात जरांगे पाटलांनी तानाजी सावंताना उत्तर दिलं आहे.

तानाजी सावंत काय बोलले होते?

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना आरोग्यमंत्री तानाजी सावंत म्हणालेले की, “जर तरच्या भूमिकांवर सांगायला मी काही पंचांग घेऊन बसलो नाही. शासनाला तुम्ही वेठीस धरणार आणि आरक्षण आताच द्या. आता कागदावर लिहून द्या अशी मागणी करणार. जे काही लिहून द्याल ते कायद्याच्या चौकटीत तरी टिकलं पाहिजे.”

हे ही वाचा >> “जरांगे ऐकत नाही म्हणल्यावर…”, छगन भुजबळांच्या विधानाने खळबळ

“आता आंदोलन का करताय? पहिलं आरक्षण मिळालं ते नंतर रद्द झालं. फडणवीस मुख्यमंत्री असताना ते उच्च न्यायालयात टिकलं, पण ठाकरे सरकार असताना सर्वोच्च न्यायालयात टिकलं नाही. ठाकरेंना ते का टिकवता आलं नाही. ते रद्द झाल्यानंतर दोन वर्षे कुणीच काही बोललं नाही. आता अचानक जसं वादळ यावं अशा पद्धतीने चाललं आहे”, असं तानाजी सावंत म्हणालेले.

    follow whatsapp