MNS : वसंत मोरेंची 'मनसे'ला सोडचिठ्ठी, राज ठाकरेंची साथ सोडण्यामागचं कारण काय?

प्रशांत गोमाणे

12 Mar 2024 (अपडेटेड: 12 Mar 2024, 03:45 PM)

Vasant More Leave MNS, Raj Thackeray : ''अखेरचा जय महाराष्ट्र, साहेब मला माफ करा'', अशा आशयाची पोस्ट करत वसंत मोरेंनी मनसेला रामराम ठोकला आहे. त्यामुळे आता वसंत मोरे (Vasant More)यांनी मनसे सोडण्यामागचं नेमकं कारण काय?

raj thackeray whay vasant more leave mns party loksabha election 2024 sainath babar sharmila thackeray

''अखेरचा जय महाराष्ट्र, साहेब मला माफ करा'', अशा आशयाची पोस्ट करत वसंत मोरेंनी मनसेला रामराम ठोकला आहे.

follow google news

Vasant More Leave MNS, Raj Thackeray: आगामी लोकसभा निवडणुकीआधी राज ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. कारण मनसेचे पुण्याचे नेते वसंत मोरे यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली आहे. ''अखेरचा जय महाराष्ट्र, साहेब मला माफ करा'', अशा आशयाची पोस्ट करत वसंत मोरेंनी मनसेला रामराम ठोकला आहे. त्यामुळे आता वसंत मोरे  (Vasant More)यांनी मनसे सोडण्यामागचं नेमकं कारण काय? हे जाणून घेऊयात.  (raj thackeray why vasant more leave mns party loksabha election 2024 sainath babar sharmila thackeray) 

हे वाचलं का?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात मशिदीवर लावण्यात आलेल्या भोंग्याच्या मुद्यावरून आक्रमक पावित्रा घेतला होता. राज ठाकरेंचा ही भूमिका कुठेतरी वसंत मोरेंना पटली नव्हती. कारण माझ्या भागातील मुस्लिम बांधव मला सहकार्य करतात,असा वसंत मोरेंचा एकंदरीत सूर होता. मनसेचे शहराध्यक्ष असलेल्या वसंत मोरे यांनी राज ठाकरेंच्या या भुमिकेमुळे अडचण होत असल्याचेही म्हटलं होतं. त्यानंतर मनसेच्या शहराध्यक्ष पदावरून त्यांची हकालपट्टी करण्यात आली होती. पक्षाच्या या कारवाईनंतरच ते नाराज असल्याची चर्चा सुरु झाली होती. 

हे ही वाचा : युती तुटली! भाजपच्या खट्टर यांनी दिला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

मात्र या नाराजीनंतर वसंत मोरे यांनी मनसे सोडली नाही. ते पक्षात होते, मात्र फारसे सक्रिय नव्हते. पुणे लोकसभा मतदारसंघातून वसंत मोरे निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. मात्र पक्षातून त्यांना हवा तसा प्रतिसाद मिळत नव्हता. याउलट राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी पुण्यात येऊन साईनाथ बाबर लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले होते.  त्यामुळे आपसूकच वसंत मोरेंचा लोकसभेतून पत्ता कट होणार होता. त्यामुळेच आता वसंत मोरेंनी मनसेला जय महाराष्ट्र केल्याचे बोलले जात आहे. 

दरम्यान वसंत मोरे यांनी मनसे सोडल्यानंतर आता ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेस करणार असल्याची चर्चा सुरू आहे. आता ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करतात का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

    follow whatsapp