Haryana Politics : युती तुटली! भाजपच्या खट्टर यांनी दिला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा
big reshuffle in the politics of Haryana : हरयाणामध्ये दुष्यंत चौटाला यांनी साथ सोडल्यामुळे भाजपचे सरकार अल्पमतात आले. त्यामुळे मनोहरलाल खट्टर यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
हरयाणात मोठा राजकीय भूकंप
जननायक जनता पार्टीसोबतची युती तुटली
भाजपला सरकार स्थापनेसाठी हवेत ५ आमदार
Manohar Lal Khattar News : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपकडून प्रादेशिक पक्षांसोबत घेण्याचे प्रयत्न सुरू असताना हरयाणात झटका बसला आहे. जननायक जनता पार्टी एनडीएतून बाहेर पडली आहे. त्यामुळे मनोहरलाल खट्टर यांनी मुख्यमंत्री पदाचा आणि मंत्रिमंडळाचा राजीनामा राज्यपालांकडे सोपवला आहे.
ADVERTISEMENT
हरयाणातील भाजप आणि जननायक जनता पक्ष (जेजेपी) यांच्या युती सरकारसाठी मंगळवार हा अत्यंत महत्त्वाचा दिवस ठरला. हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केला आहे.
हरयाणात राजकीय घडामोडी
याआधी हरयाणा सरकारचे मंत्रिमंडळ आज सामूहिक राजीनामा देऊ शकते, असे म्हटले जात आहे. यानंतर हरयाणा सरकारचे नवे मंत्रिमंडळ स्थापन केले जाऊ शकते. म्हणजे जेजेपीचा पाठिंबा असलेले भाजपचे सरकार कोसळले आहे. नव्याने सरकार स्थापनेचा दावा करणार असल्याची माहिती आहे.
हे वाचलं का?
हरयाणातील विधिमंडळ पक्षाची बैठक दुपारी 12 वाजता बोलावण्यात आली आहे. अर्जुन मुंडा आणि तरुण चुघ हे नेते निरीक्षक म्हणून या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. सोमवारी (११ मार्च) उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांनी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती, असे वृत्त आहे. खरंतर जेजेपी लोकसभा निवडणुकीत भाजपकडे 1 ते 2 जागांची मागणी करत होती.
भाजपला हव्यात सगळ्या जागा
याआधी सोमवारी दुष्यंत चौटाला यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचीही भेट घेतली होती, मात्र निवडणुकीतील युतीबाबत चर्चा होऊ शकली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजप जेजेपीला जागा देण्याच्या भूमिकेत नाही. हरयाणा भाजपही जेजेपीला जागा देण्याच्या बाजूने नाही. भाजपला सर्व दहा जागांवर निवडणूक लढवायची आहे.
ADVERTISEMENT
दरम्यान, हरयाणाचे अपक्ष आमदार नयन पाल रावत म्हणाले की, मी काल मुख्यमंत्री खट्टर यांची भेट घेतली होती. आम्ही मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्या सरकारला आमचा पाठिंबा आधीच दिला आहे. लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीवरही चर्चा होऊ शकते. मला वाटते जेजेपीसोबतची युती तोडण्याची प्रक्रिया आधीच सुरू झाली आहे.
ADVERTISEMENT
90 सदस्य संख्या असलेल्या हरयाणा विधानसभेतील बलाबल
भाजप - 41
भाजपसोबतचे अपक्ष - 6
हरयाणा लोकहित पार्टी - 1 (गोपाल कांडा यांचा भाजपला पाठिंबा)
जेजेपीपासून वेगळे झाल्यानंतर भाजपला पाठिंबा असलेल्या आमदारांची संख्या - 48
बहुमताचा आकडा – 46
विरोधातील आमदार
काँग्रेस - 30
जननायक जनता पार्टी -10
अपक्ष-1 (बलराज कुंडू)
इंडियन नॅशनल लोकदल - 1 (अभय चौटाला)
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT