केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राज्यसभेच्या 37 जागांसाठी निवडणुकांची घोषणा, मतदान अन् निकाल कधी?
Rajya Sabha Election : मतदानाची प्रक्रिया 16 मार्च 2026 रोजी पार पडणार आहे. सकाळी 9 ते सायंकाळी 4 या वेळेत मतदान होईल. त्याच दिवशी सायंकाळी 5 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार असून निकाल त्यानंतर जाहीर केले जातील. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया 20 मार्च 2026 पूर्वी पूर्ण केली जाणार आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राज्यसभेच्या 37 जागांसाठी निवडणुकांची घोषणा
मतदान अन् निकाल कधी? महाराष्ट्रातून सात सदस्य निवृत्त होणार
Rajya Sabha Election, नवी दिल्ली : एप्रिल 2026 मध्ये राज्यसभेतील सदस्यांचा कार्यकाळ संपुष्टात येत असल्याने देशभरातील 37 रिक्त होणाऱ्या जागांसाठी द्वैवार्षिक निवडणुकांची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने केली आहे. विविध राज्यांतील या जागांसाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येणार असून महाराष्ट्रातून सर्वाधिक 7 जागांसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग येण्याची चिन्हे आहेत.
मतदान अन् मतमोजणी कधी?
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या अधिकृत कार्यक्रमानुसार, 26 फेब्रुवारी 2026 रोजी निवडणुकीची अधिसूचना जारी करण्यात येणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 5 मार्च 2026 निश्चित करण्यात आली आहे. 6 मार्च रोजी अर्जांची छाननी होणार असून 9 मार्चपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेण्याची मुदत देण्यात आली आहे.
मतदानाची प्रक्रिया 16 मार्च 2026 रोजी पार पडणार आहे. सकाळी 9 ते सायंकाळी 4 या वेळेत मतदान होईल. त्याच दिवशी सायंकाळी 5 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार असून निकाल त्यानंतर जाहीर केले जातील. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया 20 मार्च 2026 पूर्वी पूर्ण केली जाणार आहे.
हेही वाचा : भिगवण : लग्न चार दिवसांवर असताना तरुणीचं अपहरण, आई आणि भावाच्या डोळ्यात चटणी टाकून पळवून नेलं










