Sharad Pawar : 2024 नंतर राजकारणातून निवृत्त होणार का?; पवार म्हणाले…

प्रशांत गोमाणे

04 Oct 2023 (अपडेटेड: 04 Oct 2023, 02:31 PM)

इंडिया टूडेच्या मुंबईतील कॉनक्लेवमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. यावेळी शरद पवारांच्या निवृ्त्तीवरही प्रश्न विचारण्यात आला होता. यावर शरद पवारांनी मजेशीर उत्तर दिले आहे.

sharad pawar will retire politics supriya sule india today conclave mumbai maharashtra politics

sharad pawar will retire politics supriya sule india today conclave mumbai maharashtra politics

follow google news

India Today Conclave Mumbai Sharad Pawar, Supriya Sule : इंडिया टुडेच्या मुंबईतील कॉनक्लेवमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) उपस्थित होत्या. यावेळी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीतील बंडखोरी, भाजपच राजकारण आणि आगामी निवडणूकींना राष्ट्रवादी कसे सामोरे जाणार आहे, यासह असंख्य मुद्यावर चर्चा झाली. तसेच यावेळी शरद पवारांच्या निवृ्त्तीवरही प्रश्न विचारण्यात आला होता. यावर शरद पवारांनी मजेशीर उत्तर दिले आहे. (sharad pawar will retire politics supriya sule india today conclave mumbai maharashtra politics)

हे वाचलं का?

राष्ट्रवादीतील बंडखोरीनंतर शरद पवारांच्या निवृत्तीची खूप चर्चा झाली. खुद्द् अजित पवारांनी देखील भाषणातून त्यांना निवृत्तीचा सल्ला दिला होता.मात्र पक्षातील बंडखोरीनंतर शरद पवारांनी राष्ट्रवादीचा मीच आश्वासक चेहरा असल्याचे म्हणत, या चर्चा फेटाळल्या होता. आज इंडिया टूडे कॉनक्लेवमध्ये देखील त्यांनी निवृत्तीचा प्रश्न विचारण्यात आला होता.

हे ही वाचा : अभिनेता रणबीर कपूरला ईडीची नोटीस; टायगर श्रॉफ, सनी लिओनीही ‘रडार’वर

2024 तुमची शेवटची निवडणूक असणार आहे का? आणि तुम्ही निवृत्ती घेणार आहात का? की घेणारच नाही, असा सवाल विचारण्यात आला होता.यावर शरद पवार म्हणाले, मी पक्षासाठी काम करत राहीन. पण मी कोणतीही जबाबदारी घेणार नाही आणि कोणतीही निवडणूक देखील लढणार नाही, असे शरद पवारांनी स्पष्ट केले. तसेच माझ्या पक्षात खूप युवा नेतृत्व आहेत. ही तरूणाई जबाबदारी घ्यायला सक्षम आहे, त्यामुळे त्यांना मार्गदर्शन करणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

शरद पवार नेहमी अँम्बेसेडर कारने दौरे करतात, खाजगी विमानाने करत नाही? यावर शरद पवार म्हणाले, मी खूप प्रवास करतो आणि लोकांना भेटतो. कारण रस्त्याने प्रवास करताना लोक तुम्हाला थांबवतात. तुम्हाला त्यांच्याशी चर्चा करता येते, त्याच्या भागातील शेतीची परिस्थिती, राज्यातील रस्त्याची परिस्थिती, तसेच जनतेच्या नेमक्या समस्या काय आहेत, या यानिमित्ताने कळतात, त्यामुळेच असा प्रवास करत असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

हे ही वाचा :Devendra Fadnavis: ‘2019 ला राष्ट्रवादीचं ‘ते’ पत्र माझ्या घरातच टाइप केलेलं..’, देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

दरम्यान चारच महिन्यापुर्वी राष्ट्रवादीत फुट पडली. या फुटीनंतर राष्ट्रवादीत अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट पडले. खरं तर राष्ट्रवादीत फुट पडल्याचे कुणीही मान्य करायला तयार नाही. पण महाराष्ट्रात आम्ही 100 टक्के सत्ता स्थापण करू, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला. तर लोकसभेत आम्ही टक्के सीट मिळवू,असे देखील शरद पवार यांनी सांगितले आहे.

    follow whatsapp