एकनाथ शिंदेंनी ठाकरेंचे खासदार फोडले, पण घोषणा का केली नाही?

मुंबई तक

• 01:08 PM • 18 Jun 2026

ठाकरे गटाचे सहा खासदार शिंदे गटात सामील होणार आहेत. मात्र याविषयी एकनाथ शिंदे यांनी घोषणा केलेली नसल्याने चर्चा रंगली आहे. त्यांनी ही घोषणा करणं का टाळलं आहे, जाणून घेऊया.

Google CTA

Shiv Sena UBT Split : एकनाथ शिंदेंनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना धक्का देत खासदार गळाला लावले. ओमराजे निंबाळकरांसह 6 खासदार फोडले पण अजूनही त्याबाबत औपचारिक घोषणा झालेली नाही. स्वतंत्र गट तयार करून हा गट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत विलीन करण्याबाबत आवश्यक ती सर्व प्रक्रिया पार पाडण्यात आल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. काही तांत्रिक बाबींची पूर्तता आणि विलीनीकरणाची प्रक्रिया निर्दोष व्हावी, यासाठी याबाबतचा अधिकृत निर्णय आठवडाअखेरीस जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. ह्या सगळ्या घडामोडी लोकसभेत डिलिमिटेश विधेयक मंजूर करवून घेण्यासाठी चालू आहेत का, याविषयीची चर्चा या व्हिडिओत करण्यात आली आहे.