छत्रपती संभाजीनगर पाठोपाठ नाशिकमध्ये महायुतीत फुट? बंडखोरी केल्याने चर्चेला उधाण

मुंबई तक

03 Jun 2026 (अपडेटेड: 03 Jun 2026, 01:46 PM)

Nashik Politics : नाशिक विधान परिषद निवडणुकीत महायुतीच्या जागावाटपात शिवसेनेला जागा सुटलेली असतानाही भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बंडखोरी करत अर्ज दाखल केल्याने महायुतीत मोठा बेबनाव निर्माण झाला आहे.

Google CTA

Nashik Politics : नाशिक विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीमधील अंतर्गत वाद  पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. जागावाटपाच्या नियमांनुसार नाशिकची जागा शिवसेनेच्या वाट्याला अधिकृतपणे सुटलेली असतानाही, ऐनवेळी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी बंडखोरी करत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यामुळे महायुतीचा धर्म पाळला जात नसल्याचे चित्र निर्माण झाले असून, ही बंडखोरी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी डोकेदुखी ठरत आहे.

हेही वाचा : 2 लाखांपर्यंतचे कर्ज माफ, ‘वन टाईम सेटलमेंट’... पाहा शेतकऱ्यांना नेमकं काय-काय मिळणार!

महायुतीतील समन्वयावर मोठे प्रश्नचिन्ह

या बंडखोरीमुळे महायुतीतील समन्वयावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नाशिकसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी जागा शिवसेनेला मिळूनही मित्रपक्षांकडून झालेली ही कृती अनपेक्षित मानली जात आहे. भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे महायुतीचे अधिकृत उमेदवार अडचणीत आले आहेत. आता या बंडखोरीवर वरिष्ठ पातळीवरून काय भूमिका घेतली जाते आणि उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव टाकला जातो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राजकीय वर्तुळात आता या घडामोडींची मोठी चर्चा सुरू झाली असून, महायुतीचे हे अंतर्गत राजकारण नेमक्या कोणत्या दिशेला जाणार, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. स्थानिक पातळीवर नेत्यांमध्ये असलेले हे मतभेद आगामी काळात विधान परिषद निवडणुकीच्या निकालावर परिणाम करण्याची दाट शक्यता आहे. जर बंडखोरी शमली नाही, तर त्याचा थेट फटका महायुतीच्या अधिकृत उमेदवाराला बसू शकतो, हे स्पष्ट दिसत आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

2 लाखांपर्यंतचे कर्ज माफ, ‘वन टाईम सेटलमेंट’... पाहा शेतकऱ्यांना नेमकं काय-काय मिळणार!