पंढरपूर : शरद पवार गटाचे आमदार भाजपच्या बैठकीत, अभिजीत पाटील काय म्हणाले?

मुंबई तक

• 04:03 PM • 12 Jun 2026

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार अभिजीत पाटील, उत्तमराव जानकर, नारायण पाटील यांनी भाजपच्या बैठकीत हजेरी लावली. यावरून सोलापूरमध्ये राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली.

Google CTA

Solapur Vidhan Parishad : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार अभिजीत पाटील, उत्तमराव जानकर, नारायण पाटील यांनी भाजपच्या बैठकीत हजेरी लावली. यावरून सोलापूरमध्ये राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली. विधान परिषदेच्या निवडणुकीत शरद पवार गटाने दिलेला उमेदवार मान्य नसल्याची भूमिका या तीन आमदारांकडून मांडण्यात आली. अशातच आता या प्रकरणावर माढ्याचे आमदार अभिजीत पाटील यांनी रोखठोक भूमिका मांडली. यावेळी ते म्हणाले की, 'आमचे मोहिते-पाटलांशी आजही संबंध चांगलेच आहेत. आमचा विरोध फक्त उमेदवाराला आहे.' दरम्यान, सोलापुरात विधानपरिषद निवडणुकीत भाजपा उमेदवार राजेंद्र राऊत विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार वसंतराव देशमुख यांच्यात सामना होतोय. मात्र राष्ट्रवादीने वसंतराव देशमुख यांना उमेदवारी दिल्याने आमदार उत्तमराव जानकर, अभिजित पाटील, नारायण पाटील यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती.