खासदारांच्या फुटीनंतर आमदारांबाबत रामदास कदम यांचा मोठा दावा

मुंबई तक

18 Jun 2026 (अपडेटेड: 18 Jun 2026, 02:04 PM)

शिवसेना ठाकरे पक्षातील खासदार पुन्हा एकदा फुटल्याच्या चर्चा आहेत. अशातच आगामी राज्याच्या राजकारणात उद्धव ठाकरे यांच्या आमदारांवरून शिवसेना नेते रामदास कदम यांनी मोठा दावा देत आमदारांबाबत पुढील मिशन हेच असल्याचं संकेत दिलं.

Google CTA

शिवसेना ठाकरे गटात पुन्हा एकदा बंड झाल्याच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत. ओमराजेंसह इतर काही खासदार शिंदे यांच्यासोबत जाणार असल्याच्या बातम्या समोर येऊ लागल्या आहेत. अशातच आता शिवसेना नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेचा हल्ला करत आगामी राजकारणात बदल होण्याची शक्यता असल्याचं म्हणत इशारा दिला. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या कामावर प्रश्न करत एकनाथ शिंदे यांच्या पक्षावर कौतुक केलं. 

दरम्यान, केंद्रात सुरू असलेल्या घडामोडींमुळे राज्यातील ऑपरेशन टायगरला वेग आला आहे. उद्धव ठाकरे यांच्या खासदारांनी शिंदे यांनी गळाला लावल्याचं चित्र लवकरच स्पष्ट होईल अशी शक्यता वर्तवण्यात येते. आमदारांबाबत सध्या चर्चेबाबत निर्णय घेतल्या जाण्याची चर्चा नसल्या तरी पुढील मिशन हेच असणार असल्याचं ते म्हणाले.