'मराठी पंतप्रधान होत असेल तर हरकत काय', उद्धव ठाकरेंकडून फडणवीसांचं कौतुक

मुंबई तक

29 Jun 2026 (अपडेटेड: 29 Jun 2026, 03:57 PM)

उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं, मराठी पंतप्रधान होत असेल तर हरकत काय, असं ते म्हणाले.

Google CTA

उद्धव ठाकरे फुटीर खासदाराच्या दौऱ्यावर जाताना दिसत आहेत. ते काल 28 जून 2026 रोजी ओमराजे यांच्या धाराशिव मतदारसंघात गेले होते. त्यानंतर ते आता शिर्डीच्या दौऱ्यावर गेले. त्यांनी शिर्डीमध्ये भाऊसाहेब वाकचौरे यांच्या मतदारसंघात जाऊन भाषण करणार असल्याचं सांगितलं. सभेपूर्वी त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली.

हे वाचलं का?

त्यांनी एकनाथ शिंदे जोरदार हल्लाबोल केला, तर दुसरीकडे त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक देखील केलं होतं. देवेंद्र फडणवीस जर मराठी पंतप्रधान होणार असतील काहीही हरकत नाही, असं ठाकरे म्हणाले. यावरून आता उद्धव ठाकरे यांनी मराठीच्या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस यांच्या पंतप्रधान पदाबाबत कौतुक केलं.