IND vs WI: रोहित शर्माने रचला इतिहास! टेस्टमध्ये अशी कामगिरी करणारा पहिलाच फलंदाज

प्रशांत गोमाणे

23 Jul 2023 (अपडेटेड: 19 Sep 2023, 07:00 AM)

टीम इंडियाच्या दुसऱ्या डावाला सुरूवात झाली आहे. या डावात रोहित शर्माने मोठा विक्रम केला आहे. आणि विशेष म्हणजे टेस्टमध्ये अशी कामगिरी करणारा रोहित शर्मा पहिलाच खेळाडू ठरला आहे. त्यामुळे त्याच्या या विक्रमाची चर्चा रंगली आहे.

ind vs wi rohit sharma create history becomes first batter in test cricket

ind vs wi rohit sharma create history becomes first batter in test cricket

follow google news

पोर्ट ऑफ स्पेनमध्ये सुरु असलेल्या दुसऱ्या टेस्ट सामन्यात टीम इंडियाने वेस्ट इंडिजचा पहिला डाव 255 धावांवर ऑल आऊट केला आहे. त्यामुळे आता टीम इंडियाने 183 धावांची आघाडी घेतली होती. यासह टीम इंडियाच्या दुसऱ्या डावाला सुरूवात झाली आहे. या डावात रोहित शर्माने मोठा विक्रम केला आहे. आणि विशेष म्हणजे टेस्टमध्ये अशी कामगिरी करणारा रोहित शर्मा पहिलाच खेळाडू ठरला आहे. त्यामुळे त्याच्या या विक्रमाची चर्चा रंगली आहे. (ind vs wi rohit sharma create history becomes first batter in test cricket)

हे वाचलं का?

टीम इंडियाच्या दुसऱ्या डावात रोहित शर्माने अर्धशतक ठोकले आहे. पण हे अर्धशतक त्याला शतकात बदलता आले नाही आणि तो 57 धावावर आऊट झाला. मात्र अर्धशतक ठोकून देखील रोहित शर्माने मोठा इतिहास रचला आहे. रोहित शर्माने टेस्ट क्रिकेटमध्ये 30 वेळा 10 पेक्षा जास्त स्कोर केला आहे. याआधी हा विक्रम श्रीलंकेचा दिग्गज खेळाडू महेला जयवर्धन याच्या नावावर होता. त्याने 29 वेळा 10 पेक्षा जास्त स्कोर केला आहे. त्यामुळे आता रोहित शर्माने 30 वेळा अशी कामगिरी करून जयवर्धनचा रेकॉर्ड केला आहे.

हे ही वाचा : Video : प्रेमाने मिठी मारली,गालावर किस, ‘विराट’च्या भेटीने WI क्रिकेटपटूची आई भारावली

रोहित शर्माने 30 वेळा 10 पेक्षा जास्त स्कोर केला आहे. टेस्टमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. त्यामुळे त्याच्या या विक्रमाची चर्चा होतेय. शेवटच्या 30 कसोटी डावांमध्ये रोहितचे स्कोअर: 12, 161, 26, 66, 25*, 49, 34, 30, 36,12*, 83, 21, 19, 59, 11, 127, 29, 15, 46, 120, 32, 31, 12, 12, 35, 15, 43, 103, 80, 57

टेस्टमध्ये सर्वाधिक दुहेरी धावसंख्या करणारे खेळाडू

रोहित शर्मा – 30
महेला जयवर्धने – 29
लेन हटन – 25
रोहन कन्हाई – 25
एबी डिव्हिलियर्स – 24

जलद 50 धावा

यासह दुसऱ्या डावात रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांनी स्फोटक फलंदाजी करत 5.3 ओव्हरमध्ये 50 धावा केल्या आहेत. भारताच्या कसोटी इतिहासातील पहिल्या विकेटसाठी 50 धावांची ही सर्वात जलद भागीदारी आहे. भारताने 1932 मध्ये पहिल्यांदा कसोटी खेळला आणि तेव्हापासून सहाव्या ओव्हरआधी 50 धावांचा स्कोअर बोर्डवर टांगला गेला असे कधीच घडले नाही.

दरम्यान मोहम्मद सिराजच्या 5 विकेटचा बळावर टीम इंडियाने वेस्ट इंडिजला 255 धावांत गुंडाळले आहे. शेवटच्या 5 विकेट 26 धावांत पडल्या आहे. यासह भारताने पहिल्या डावाच्या आधारे 183 धावांची आघाडी घेतली आहे. आता भारत किती धावावर दुसरा डाव घोषित करते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

    follow whatsapp