IND vs NZ 3rd T20 : गिलचं वादळ, बॉलर्सचा जलवा; भारताकडून मालिकाही खिशात

मुंबई तक

• 05:09 PM • 01 Feb 2023

IND vs NZ 3rd T20 News : अहमदाबाद : येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर बॅट्समन शुभमन गिल (Shubhman Gill) आणि बॉलर्सच्या यांच्या जोरावर भारताने (India) न्यूझीलंडविरुद्ध तिसऱ्या टी-20 सामन्यात मोठा विजय साकारला. गिलच्या शतकी खेळीनंतर भारताच्या २३५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या चांगलीच दमछाक झाली. अवघ्या ६६ धावांवर न्यूझीलंडचा संघ ऑलआऊट झाला. त्यामुळे भारताने तब्बल १६८ […]

Mumbaitak
follow google news

IND vs NZ 3rd T20 News :

हे वाचलं का?

अहमदाबाद : येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर बॅट्समन शुभमन गिल (Shubhman Gill) आणि बॉलर्सच्या यांच्या जोरावर भारताने (India) न्यूझीलंडविरुद्ध तिसऱ्या टी-20 सामन्यात मोठा विजय साकारला. गिलच्या शतकी खेळीनंतर भारताच्या २३५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या चांगलीच दमछाक झाली. अवघ्या ६६ धावांवर न्यूझीलंडचा संघ ऑलआऊट झाला. त्यामुळे भारताने तब्बल १६८ धावांनी तिसरा टी-20 सामना जिंकला. तसंच तीन सामन्यांची मालिकाही खिशात घातली. (with the performance Shubman Gill and the bowlers, India achieved a big victory against New Zealand in the third T20 match)

सुरुवातीला भारताचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र भारताची सुरुवात काहीशी खराब झाली. भारताचा सलामीवीर इशान किशन दुसऱ्याच षटकात १ धाव करून बाद झाला. त्यानंतर आलेल्या राहुल त्रिपाठीला जोडीला घेत शुभमन गिलने मोठे फटके मारायला सुरुवात केली. गिल आणि त्रिपाठीच्या जोडीने भारताला अवघ्या ७ षटकामध्येच ६९ चा आकडा गाठून दिला. मात्र तो षटकार मारण्याच्या नादात राहुल त्रिपाठी बाद झाला. २२ चेंडूत ४४ धावा चोपत त्याने गिलला चांगली साथ दिली.

IND vs NZ T20: वॉश्गिंटनची शर्थ पण ‘सुंदर’ खेळी व्यर्थ, इंडिया पराभूत

त्यानंतर मैदानात आलेल्या सुर्यकुमार यादव आणि गिल यांच्या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी ३८ धावांची भागीदारी रचली. मात्र ही भागीदारी टिकनेरने तोडली. २४ धावांवर असताना त्याने सुर्यकुमार यादवला बाद केलं. एका बाजूला विकेट्स पडत असताना गिलने मात्र त्याची तुफानी बॅटिंग चालूच ठेवली होती. त्याने अवघ्या ५४ चेंडूमध्ये शतकी खेळी केली. तसंच भारतालाही २०० च्या पार पोहचवले. गिलच्या बॅटिंगच्या जोरावर भारताने २३४ धावांचा डोंगर उभा केला.

IND vs NZ T20 : फिरकीपटूंचे वर्चस्व! दुसरा सामना जिंकत भारताचे दमदार पुनरागमन

भारताने दिलेले २३५ धावांचे बलाढ्य आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडच्या संघाची चांगलीच दमछाक झाली. पहिल्या दोन षटकात न्यूझीलंडला दोन मोठे धक्के मिळाले. हार्दिकने पहिल्याच षटकात फिन एलनला तर अर्शदीप सिंगने दुसऱ्या षटकात डेवॉन कॉन्वेला माघारी धाडलं. त्यानंतरही पुढच्या तीन षटकातच न्यूझीलंडच्या आणखी तीन विकेट्स पडल्या. भारताने पॉवर प्लेमध्येच न्यूझीलंडची अवस्था ५ बाद २१ धावा अशी केली.

त्यानंतर शिवम मावीने ९व्या षटकात पाठोपाठ दोन विकेट्स घेतल्या. त्यानंतर हार्दिक पांड्याने न्यूझीलंडच्या संघाची शेपूट कापून काढतं भारताना मोठा विजय मिळवून दिला. आजच्या सामन्यात हार्दिक पांड्याने ४, अर्शदीप सिंगने २, उमरान मलिकने २ आणि शिवम मावीने २ विकेट्स घेतल्या. तसंच शुभमन गिलने शतकी खेळी करत भारताला मोठा विजय मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावली.

    follow whatsapp