Tokyo Olympics 2020 : पावसाचा खोडा! चुरशीच्या खेळानंतरही गोल्फमधलं Aditi Ashok चं पदक थोडक्यात हुकलं

मुंबई तक

• 05:12 AM • 07 Aug 2021

टोकिया ऑलिम्पिक्स मध्ये भारताला गोल्फमध्ये पदक मिळण्याची आशा होती. याचं कारण होतं आदिती अशोक कारण तिने उत्तम खेळ करत या यादीत स्थान मिळवलं होतं. भारतीय वेळेनुसार पहाटे 4.20 ला ही मॅच होती. मात्र आज सकाळी जपानमध्ये पाऊस पडला आणि मॅच रिशेड्युल करावी लागली. याचाच फटका आदिती अशोकला बसला. तिला किमान रौप्य पदक मिळेल असं वाटत […]

Mumbaitak
follow google news

टोकिया ऑलिम्पिक्स मध्ये भारताला गोल्फमध्ये पदक मिळण्याची आशा होती. याचं कारण होतं आदिती अशोक कारण तिने उत्तम खेळ करत या यादीत स्थान मिळवलं होतं. भारतीय वेळेनुसार पहाटे 4.20 ला ही मॅच होती. मात्र आज सकाळी जपानमध्ये पाऊस पडला आणि मॅच रिशेड्युल करावी लागली. याचाच फटका आदिती अशोकला बसला. तिला किमान रौप्य पदक मिळेल असं वाटत होतं. मात्र ती चौथ्या स्थानावर गेली त्यामुळे तिचं पदक हुकलं आहे.

हे वाचलं का?

वर्ल्ड रॅकिंगमध्ये 200 व्या क्रमाकांवर असलेल्या आदितीने वर्ल्ट रॅकिंगमध्ये अग्रस्थानी असलेल्या नेल्ली कोर्डा आणि मोनो इनामी यांना कडवी टक्कर दिली. तिसऱ्या राऊंडपर्यंत आदितीने तिचं दुसरं स्थान कायम ठेवल होतं. त्यामुळे आदितीला किमान सिल्व्हर मेडल किंवा ब्राँझ मेडल मिळेल अशी आशा होती. मात्र रंगतदार आणि चुरशीचा खेळ करूनही ऐनवेळी पाऊस आला आणि आदिती आधी तिसऱ्या स्थानावर आणि मग चौथ्या स्थानावर गेली. त्यामुळे तिचं पदक अगदी थोडक्यात हुकलं आहे. मात्र तिने जी झुंज दिली त्याचं कौतुक सोशल मीडियावर केलं जातं आहे. खराब हवामान आणि पावसाने आधी आदितीच्या खेळात आणि त्यानंतर पदकाच्या वाटेत खोडा घातला.

1998 मध्ये जन्मलेल्या आदितीने वयाच्या सहाव्या वर्षापासून गोल्फ खेळण्यास सुरूवात केली होती. वयाच्या नवव्या वर्षी तिने राष्ट्रीय विजेतेपद जिंकले. 2016 मध्ये तिने व्यावसायिक स्पर्धा खेळण्यास सुरूवात केली होती. टोकियो ऑलिम्पिक्समध्ये तिला पदक मिळू शकलं नाही मात्र तिच्या खेळाचं प्रचंड कौतुक होतं आहे. खेळ सुरू झाल्यापासूनच आदिती दिग्गज खेळाडूंना टक्कर देत होती. अखेरच्या क्षमी न्यूझिलंडच्या लिडिया कोचं आव्हान आदितीला परतवता आलं नाही त्यामुळे ती चौथ्या स्थानावर गेली आणि त्यामुळेच भारताचं गोल्फमध्ये पदक मिळवण्याचं स्वप्न अधुरं राहिलं.

आदितीने तिसऱ्या फेरीत अंडर 67 स्कोअर करत दुसरं स्थान कायम राखलं होतं. तिसऱ्या फेरीनंतर आदिती दुसऱ्या स्थानी एकटीच होती. अमेरिकेची नेली कोर्डा ही अव्वल स्थानी होती आणि आदितीपेक्षा तीन स्ट्रोक्सने पुढे होते. न्यूझीलंडची लीडिया को, ऑस्ट्रेलियाची हॅना ग्रीन, डेन्मार्कची ख्रिस्टिन पेडरसन आणि जपानची मोने इनामी या संयुक्तपणे तिसऱ्या स्थानी होत्या.

आदितीने स्पर्धेच्या आधी काय म्हटलं होतं?

अनेकांना गोल्फमध्ये नेमकं काय होतं ते माहित नसतं. त्यामुळे मी काय कामगिरी करते किंवा मला पदकाची संधी किती आहे? याबाबत अंदाज व्यक्त करणं कठीण होतं. ऑलिंपिकमधे केलेली कामगिरी अनेकांच्या लक्षात राहते. रिओ स्पर्धेनंतर व्यावसायिक मालिकेतील तीन स्पर्धा जिंकल्या होत्या, पण त्यानंतर ऑलिम्पिकच्या कामगिरीवर मी लक्ष्य ठेवलं. असं ती म्हणाली होती.

आपलं लक्ष्य पूर्ण करण्यासाठी आदितीने पूर्ण ताकदीने लढत दिली खरं पण थोडक्यात तिचं पदक हुकलं आहे. सोशल मीडिया असो किंवा टोकियो ऑलिम्पिकचं मैदान सगळीकडेच आदितीने केलेल्या खेळाचं प्रचंड कौतुक होतं आहे.

    follow whatsapp