मोठी बातमी! आयपीएलवरील स्थगिती हटवली, अंतिम सामना कधी होणार?

IPL 2025 Restart : भारत पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये युद्धजन्य परिस्थितीमुळे तणाव निर्माण झाला होता. बीसीसीआयने लीग स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आयपीएलवरून स्थगिती हटवण्यात आली आहे.

Mumbai Tak

मुंबई तक

11 May 2025 (अपडेटेड: 12 May 2025, 01:01 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

आयपीएलवरून स्थगिती हटवली.

point

अंतिम सामना कधी होणार?

IPL 2025 Restart : भारत पाकिस्तान या दोन्ही देशातील युद्धजन्य परिस्थिती पाहता तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे बीसीसीआयने लीग स्थगित करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही देशातील शस्त्रसंधीनंतर आयपीलच्या फायनल सामन्याला विलंब होऊ शकतो. हैदराबादच्या राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियमवर क्वालिफायर आणि 1 इलिमेनेटर सामना होणार आहे. तर कोलकातामध्ये फायनल सामना खेळवण्यात येणार आहे. दरम्यान फायनल सामन्याला विलंब होईल, असे सांगण्यात येत आहे. 

हे वाचलं का?

आयपीएल फायनल कधी होणार?

आयपीएल 2025 ची फायनल ही 30 मे किंवा 1 जूनपर्यंत होणार असल्याची शक्यता आहे. जून महिन्यात वातावरणात बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जर वातावरणात बदल निर्माण झाला तर फायनल सामना हा कोलकाताऐवजी अहमदाबाद येथे खेळवण्यात येईल. 

सध्या सुरू असणाऱ्या आयपीएलच्या हंगामात एकूण 57 सामने पूर्ण झाले आहेत. 58 वा सामना हा 8 मे रोजी पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स या संघादरम्यान खेळवण्यात धर्मशाळा येथे खेळवण्यात आला होता. मात्र, युद्धजन्य परिस्थितीमुळे सामना थांबवण्यात आला होता. जर हा सामना वगळल्यास उर्वरित एकूण 12 सामने आहेत. ज्यात एकूण 4 प्लेऑफ सामने खेळवण्यात येणार आहेत. 

2009 च्या लोकसभा निवडणुकीमुळे आयपीएलचे सामने द. आफ्रिकेत खेळवण्यात आले होते. अशातच 2020 या वर्षात एप्रिल आणि मे महिन्यात खेळवण्यात येणारी आयपीएल कोरोनामुळे  सप्टेंबर महिन्यात खेळवण्यात आली होती. 

दरम्यान, आयपीएल 2024 मधील सामने दोन टप्प्यात खेळण्यात आले होते. ज्यात 22 मार्च ते 7 एप्रिल हा पहिला टप्पा खेळवण्यात आला होता. ज्यात एकूण 21 सामने खेळवण्यात आले. यानंतर निवडणुकीच्या तारखा निश्चित केल्यानंतर उर्वरित सामने हे नवीन वेळापत्रकानुसार खेळवण्यात आले. ज्यामुळे स्पर्धा सुरळीतपणे पार पाडली होती. 

आयपीएल स्थगित करण्याआधीचं वेळापत्रक 

59. लखनऊ सुपर जायंट्स विरूद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, 9 मे, रोजी सायंकाळी 7:30 वाजता, लखनऊ.

60. सनराइजर्स हैदराबाद विरूद्ध कोलकाता नाइट रायडर्स, 10 मे रोजी सायंकाळी 7:30 वाजता, हैदराबाद.

61. पंजाब किंग्स विरूद्ध मुंबई इंडियन्स, 11 मे, दुपारी 3:30 वाजता, धर्मशाला.

62. दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध गुजरात टायटन्स, 11 मे, सायंकाळी 7:30 वाजता, दिल्ली.

63. चेन्नई सुपर किंग्स विरूद्ध राजस्थान रॉयल्स, 12 मे, सायंकाळी 7:30 वाजता, चेन्नई.

64. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरूद्ध सनरायजर्स हैदराबाद, 13 मे, सायंकाळी 7:30 वाजता, बेंगलुरु.

65. गुजरात टायटन्स विरूद्ध लखनऊ सुपर जायंट्स, 14 मे, सायंकाळी 7:30 वाजता, अहमदाबाद.

66. मुंबई इंडियन्स विरूद्ध दिल्ली कॅपिटल्स, 15 मे, सायंकाळी 7:30 वाजता, मुंबई.

67. राजस्थान रॉयल्स विरूद्ध पंजाब किंग्स, 16 मे, सायंकाळी 7:30 वाजता, जयपुर.

68. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरूद्ध कोलकाता नाइट रायडर्स, 17 मे रोजी सायंकाळी 7:30 वाजता, बंगळुरु.

69. गुजरात टायटन्स विरूद्ध चेन्नई सुपर किंग्स, 18 मे, दुपारी 3:30 वाजता, अहमदाबाद.

70. लखनऊ सुपर जायंट्स विरूद्ध सनरायजर्स हैदराबाद, 18 मे, सायंकाळी 7:30 वाजता, लखनऊ.

71. क्वालिफायर 1, 20 मे, सायंकाळी 7:30 वाजता, हैदराबाद.

72. एलिमिनेटर, 21 मे, सायंकाळी 7:30 वाजता, हैदराबाद.

73. क्वालिफायर 2, 23 मे, सायंकाळी 7:30 वाजता, कोलकाता.

74. फायनल 25 मे रोजी सायंकाळी 7:30 वाजता, कोलकाता.

    follow whatsapp