Ranji Trophy : खडुस आर्मीचा पहिला विजय, गोव्यावर ११९ धावांनी केली मात

मुंबई तक

• 12:29 PM • 27 Feb 2022

गतविजेत्या सौराष्ट्राविरुद्ध पहिल्या सामन्यात विजयाने हुलकावणी दिल्यानंतर मुंबईने रणजी करंडक स्पर्धेत आपल्या पहिल्या विजयाची नोंद केली आहे. अहमदाबाद येथे पार पडलेल्या सामन्यात मुंबईने गोव्यावर ११९ धावांनी मात केली आहे. दोन्ही डावांत मिळून ११ बळी घेणारा शम्स मुलानी मुंबईच्या विजयाचा शिल्पकार ठरला आहे. मुंबईने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा बॅटींगचा निर्णय घेतला. परंतू पहिल्या डाव्यात गोव्याच्या लक्ष गर्गने […]

Mumbaitak
follow google news

गतविजेत्या सौराष्ट्राविरुद्ध पहिल्या सामन्यात विजयाने हुलकावणी दिल्यानंतर मुंबईने रणजी करंडक स्पर्धेत आपल्या पहिल्या विजयाची नोंद केली आहे. अहमदाबाद येथे पार पडलेल्या सामन्यात मुंबईने गोव्यावर ११९ धावांनी मात केली आहे. दोन्ही डावांत मिळून ११ बळी घेणारा शम्स मुलानी मुंबईच्या विजयाचा शिल्पकार ठरला आहे.

हे वाचलं का?

मुंबईने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा बॅटींगचा निर्णय घेतला. परंतू पहिल्या डाव्यात गोव्याच्या लक्ष गर्गने केलेल्या भेदक माऱ्यासमोर मुंबईची दाणादाण उडाली. सर्फराज खानचं अर्धशतक आणि अखेरच्या फळीत तनुष कोटीयेनने केलेल्या महत्वपूर्ण ३० धावांच्या जोरावर मुंबईने पहिल्या डावात १६३ धावांपर्यंत मजल मारली. गोव्याकडून गर्गने ६ तर अमित यादवने ४ विकेट घेतल्या.

प्रत्युत्तरादाखल गोव्याने फलंदाजीत मुंबईला चारीमुंड्या चीत करत पहिल्या डावात महत्वपूर्ण आघाडी घेतली. अमोघ देसाई, एकनाथ केरकर, लक्ष गर्ग यांची अर्धशतकं आणि त्यांना सुयश प्रभुदेसाई, कर्णधार स्नेहल कौथनकर यांनी दिलेल्या उत्तम साथीच्या जोरावर गोव्याने ३२७ धावांपर्यंत मजल मारली. पहिल्या डावात गोव्याकडे १६४ धावांची आघाडी होती. मुंबईकडून पहिल्या डावात शम्स मुलानीने ६, धवल कुलकर्णीने २ तर मोहीत अवस्थी आणि तनुष कोटीयन यांनी १-१ बळी घेतला.

Rohit Sharma Lifestyle : रोहित शर्माकडे दीड कोटींची तर फक्त BMW, कोट्यवधींचा आहे मालक

दुसऱ्या डावात मुंबईने तुलनेत चांगली सुरुवात केली. कर्णधार पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे, शम्स मुलानी, सर्फराज खान, तनुष कोटीयन यांनी महत्वपूर्ण इनिंग खेळत मुंबईला ३९५ धावांचा टप्पा गाठून दिला. गोव्याला अखेरच्या दिवशी विजयासाठी मुंबईने २३२ धावांचं आव्हान दिलं होतं.

परंतु मुंबईच्या गोलंदाजांनी दुसऱ्या डावात आपला सर्व अनुभव पणाला लावत गोव्याची दुसऱ्या डावात भंबेरी उडवली. गोव्याचा एकही फलंदाज मुंबईच्या माऱ्याचा सामना करु शकला नाही आणि संपूर्ण संघ ११२ धावांत संपुष्टात आला. मुंबईकडून दुसऱ्या डावात शम्स मुलानीने ५, तनुष कोटीयनने ३ तर धवल कुलकर्णीने दोन विकेट घेतल्या.

नवजात मुलीचा मृत्यू, आभाळाएवढं दुःख पचवत ‘तो’ मैदानात उतरला; शतक झळकावून स्वतःला केलं सिद्ध

    follow whatsapp