काकीचं पुतण्यावर कसं जडलं प्रेम? काका म्हणाला, 'तो रोज घरी यायचा आणि...', वाचा Inside स्टोरी

मुंबई तक

Aunt And Nephew Love Story Viral : मागील काही दिवसांपासून बिहारच्या जमुई जिल्ह्याची तुफान चर्चा रंगली आहे. काकी-पुतण्याच्या लव्ह स्टोरीनं सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

ADVERTISEMENT

Married Woman Shocking Viral News
Married Woman Shocking Viral News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

काकी-पुतण्याच्या लव्ह स्टोरीनं उडाली खळबळ

point

काकी-पुतण्याचा नवा व्हिडीओ झाला व्हायरल

point

काकाने सांगितली प्रेमप्रकरणाची इनसाईड स्टोरी

Aunt And Nephew Love Story Viral : मागील काही दिवसांपासून बिहारच्या जमुई जिल्ह्याची तुफान चर्चा रंगली आहे. काकी-पुतण्याच्या लव्ह स्टोरीनं सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. काकी-पुतण्याचं लग्नाचं प्रकरण समोर आल्यानंतर एक खळबळजनक व्हिडीओही व्हायरल झाला. त्यानंतर नेटकऱ्यांनी या व्हिडीओ भन्नाट प्रतिक्रियांचा वर्षाव केला. अशातच पीडित व्यक्तीने माध्यमांशी बोलताना याप्रकरणाबाबत धक्कादायक खुलासा केला. जाणून घेऊयात याप्रकरणाची इनसाईड स्टोरी.. 

काय आहे संपूर्ण प्रकरण?

लव्ह स्टोरीची ही धक्कादायक घटना बिहारच्या जमुई जिल्ह्यात घडली. जमुई पोलीस ठाणे हद्दीत सिकरिया गावातील विशाल कुमार दुबे (काका) चं लग्न पटनाच्या आयुषीसोबत (काकी) 2021 मध्ये झालं होतं. विशालच्या घराच्या शेजारीच त्याचा पुतण्या सचिन राहत होता. तो नेहमी त्यांच्या घरी येजा करायचा.

याचदरम्यान सचिन आणि आयुषीची जवळीक वाढली. दोघेही ऐकमेकांशी तासनतास फोनवर बोलायचे. जवळपास दोन वर्ष दोघांचंही प्रेमसंबंध सुरु होते. परंतु, त्यांच्या अफेअरबाबत विशालला समजलं, तेव्हा दोघांमध्ये वादविवाद झाले. त्यानंतर आयुषीने सचिनसोबत राहायचा निर्णय घेतला. त्यानंतर 5 दिवसानंतर दोघेही गावी परतले. गावातील मंदिरात विशालसमोरच सचिन आणि आयुषीने लग्न केलं. 

हे ही वाचा >> पतीला सोडून पत्नी पळाली बॉयफ्रेंडसोबत, महिलेच्या वडिलांनीच केली मदत, पण...

विशालने सांगितली इनसाईड स्टोरी

सचिन आणि आयुषीची रील व्हायरल झालीय. या व्हिडीओत ते दोघेही मस्ती करताना दिसतात. तर दुसरीकडे विशाल नैराश्यात गेला असून या परिस्थितून सावरण्याचा प्रयत्न करतोय. विशालने माध्यमांशी बोलताना या दोघांच्या प्रेमप्रकरणाबाबत धक्कादायक खुलासे केले. 

घराची जबाबदारी दिली होती, पण नंतर..

विशालने म्हटलं की, घरात राहून दोघांमध्ये जवळीक वाढली. सचिनच्या प्रेमात पडलेल्या आयुषीने संपूर्ण कुटुंबाला धोका दिला आहे. सचिनसोबतच राहायचं आहे, असा हट्टही तिने धरला होता. दोघांनीही जीवे मारण्याची धमकीही दिली. आयुषी सचिनच्या प्रेमात इतकी वेडीपिशी झाली की, तिला त्याच्यासोबत राहायचं आहे. 

हे ही वाचा >> वारकऱ्यांना अडवून कोयत्याचा धाक दाखवून लुटलं, चिमुकलीवर बाजूला नेत अत्याचार, दौंडमध्ये संताप

हे वाचलं का?

    follow whatsapp