लग्नाआधीच राहिली गरोदर; रागात वडिलांनी मर्यादाच सोडल्या, जंगलात जाऊन मुलीसोबत...

मुंबई तक

कर्नाटकातील शिवमोगा शहरात मुलगी लग्नाआधीच गरोदर राहिल्यामुळे एका वडिलांनी आपल्याच मुलीवर जीवघेणा हल्ला केल्याची बातमी समोर आली आहे.

ADVERTISEMENT

लग्नाआधीच राहिली गरोदर; रागात वडिलांनी मर्यादाच सोडल्या...
लग्नाआधीच राहिली गरोदर; रागात वडिलांनी मर्यादाच सोडल्या...
social share
google news

बातम्या हायलाइट

point

लग्नाआधीच गरोदर राहिल्यामुळे वडिलांनी रागाच्या भरात...

point

कर्नाटकातील धक्कादायक बातमी

Karnataka News: कर्नाटकातील शिवमोगा शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुलगी लग्नाआधीच गरोदर राहिल्यामुळे एका वडिलांनी आपल्याच मुलीवर जीवघेणा हल्ला केला. मुलगी लग्नाआधीच गरोदर राहिल्याचं कळताच वडिलांनी रागाच्या भरात मुलीवर जीवघेणा हल्ला केल्याचं सांगितलं जात आहे. 

लग्नाआधीच मुलगी गरोदर असल्याचं कळाल्यानंतर घटनेतील आरोपी म्हणजेच मुलीच्या वडिलांनी आपल्या पत्नीला सोबत घेतलं आणि मुलीला उपचारांसाठी रुग्णालयात नेत असल्याचं तिला सांगितलं. मात्र, रुग्णालयात जात असताना रस्त्यातच आरोपी त्यांना कन्नूरच्या उलवी जवळील कनल्ली गावाच्या एका जंगलात घेऊन गेला. तिथे गरोदर असलेल्या मुलीला तिच्या वडिलांनी बेदम मारहाण केली आणि तिच्यावर हल्ला करत तिला मारण्याचा देखील प्रयत्न केला. 

हल्ल्यानंतर मुलीला जंगलातच सोडलं..

गंभीर हल्ल्यानंतर पीडित तरुणी तिथेच बेशुद्ध झाली. तिच्या हल्ला करुन तिला मारण्याचा प्रयत्न केल्यानंतर आई-वडिलांनी मुलीला जंगलातच सोडून दिल्याचा आरोप केला जात आहे. काही काळानंतर, मुलगी शुद्धीत आल्यानंतर तिने कशीतरी तिथल्या उपस्थित गावकऱ्यांची मदत घेतली. या घटनेनंतर तिला उलवीच्या प्राथमिक स्वास्थ्य केंद्रात दाखल करण्यात आलं. प्राथमिक स्वास्थ्य केंद्रात तरुणीची प्रकृती गंभीर असल्याचं कळताच तिला शिवमोगाच्या मेगन रुग्णालयात रेफर करण्यात आलं. 

हे ही वाचा: ताट, लाटणं, उलाथणं घेऊन बदडलं, तरूणाला घेरून चोपलं...हॉटेल भाग्यश्रीवर पुन्हा काय राडा?

तक्रार दाखल 

पीडित तरुणीने पोलिसांनी दिलेल्या जबाबानुसार, तरुणीच्या आई- वडिलांनी तिच्या जीवघेणा हल्ला केला आणि तिला मारुन टाकण्याचा प्रयत्न केला. आपल्या आई-वडिलांवरच तरुणीने आपल्याला मारहाण केल्याचा आणि मारुन टाकण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप लावला आहे. याप्रकरणी सोराबा टाउन पोलिसांनी तक्रार दाखल केली असून तपास सुरु केला आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp