Bhavani Revanna : ‘जीव द्यायचा तर बस खाली जाऊन मर ना’, माजी पंतप्रधानांची सून कोणाला असं म्हणाली?
माझ्या कारची किंमत 1.5 कोटी रूपये आहे. आता कारचे नुकसान कोण भरून देईल? माझी दीड कोटीची कार खराब झाली आहे, असे बोलताना देखील भवानी रेवण्णा व्हिडिओत दिसल्या आहेत.
ADVERTISEMENT
Bhavani Revanna Viral Video : सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ मनोरंजनात्मक असतात, तर काही व्हिडिओ खूपच धक्कादायक असतात. असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत एक श्रीमंत महिला अपघातग्रस्त दुचाकीस्वारावर भडकल्याची घटना घडली आहे. ही श्रीमंत महिला माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा (Hd Deve gowda) यांची सून (Bhavani Revanna) आहे. या महिलेचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओतील महिलेच्या कृत्यावर आता संताप व्यक्त होत आहे. (bhavani revanna video viral ex prime minister hd deve gowda daughter in law angry on biker)
ADVERTISEMENT
माजी पंतप्रधान एचडी देवगौडा यांची सून आणि एचडी रेवन्ना यांची पत्नी भवानी रेवन्ना यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत भवानी रेवन्ना एका दुचाकीस्वारावर चांगलीच भडकली आहे. खरं तर एका दुचाकीस्वाराने त्याच्या आलीशान कारला धडक दिली होती. या संपूर्ण प्रकारानंतर भवानी रेवन्ना दुचाकीस्वारावर भडकल्या आहेत. या संदर्भातला त्यांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हे ही वाचा : Nagpur: आईने नाश्ता दिला नाही म्हणून मुलाने स्वत:लाच संपवलं, लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह!
व्हायरल व्हिडिओत एका दुचाकीस्वाराने भवानी रेवन्ना यांच्या दुचाकीला धडक मारली आहे. या धडकेनंतर भवानी रेवन्ना दुचाकीस्वारावर चांगल्याच भडकल्या आहेत. ‘माझ्या कारचे नुकसान करण्यापेक्षा एका बसखाली जाऊन मर ना’, असा धक्कादायक सल्ला भवानी रेवन्ना यांनी दुचाकीस्वाराला दिला होता. या सल्ल्यावरून नेटकरी त्यांच्यावर संताप व्यक्त करतात. इतकंच नाही तर या संपूर्ण घटनेचा तमाशा पाहणाऱ्यांना देखील त्यांनी खडेबोल सुनावले.
हे वाचलं का?
माझ्या कारची किंमत 1.5 कोटी रूपये आहे. आता कारचे नुकसान कोण भरून देईल? माझी दीड कोटीची कार खराब झाली आहे, असे बोलताना देखील भवानी रेवण्णा व्हिडिओत दिसल्या आहेत. एकीकडे भवानी रेवण्णा यांना त्यांच्या आलिशान कारची पडली आहे, तर नेटकरी दुचाकीस्वाराच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करत आहेत.
हे ही वाचा : Ishawar Sahu : दंगलीत मारला गेला मुलगा, मजुराने काँग्रेस आमदाराला केला ‘गेम’
दरम्यान या घटनेत जेडीएसच्या नेत्या भवानी रेवन्ना यांची कारची आणि दुचाकीची टक्कर झाली होती. यानंतर भवानी रेवन्नाचा ड्रायव्हर मंजूनाथने दुचाकीस्वार शिवन्ना विरूद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल केला आहे. म्हैसूर जिल्ह्यातील सालीग्राम पोलीस ठाण्यात दुचाकीस्वाराच्या विरोधात CrPC कलम 157 अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT