Rishi Sunak : ब्रिटनचे पंतप्रधान सुनक पत्नी अक्षतासोबत अक्षरधाम मंदिरात, Exclusive Photos

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

British Prime Minister Rishi Sunak reached Akshardham Temple in Delhi today on the second day of the G-20 summit.
British Prime Minister Rishi Sunak reached Akshardham Temple in Delhi today on the second day of the G-20 summit.
social share
google news

Rishi Sunak Visit Akshardham Temple : ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक हे G-20 शिखर परिषदेच्या दुसऱ्या दिवशी (10 सप्टेंबर) दिल्लीतील अक्षरधाम मंदिरात पोहोचले. सुनक यांनी पत्नी अक्षतासोबत येथे स्वामी नारायणाचे दर्शन घेतले. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी जी-20 शिखर परिषदेत अनेक देशांच्या प्रमुखांशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. याआधी सुनक यांनी मंदिरात प्रार्थना केली.

ADVERTISEMENT

अत्यंत कडेकोट बंदोबस्तात ऋषी सुनक हे त्यांच्या ताफ्यासह अक्षरधाम मंदिरात पोहोचले. यावेळी हलका पाऊस पडत होता, त्यामुळे सुनक आणि त्यांच्या पत्नी अक्षता मंदिराच्या आवारात छत्री घेऊन जाताना दिसले.

ऋषी सुनक-अक्षता मूर्ती यांनी असा घालवला वेळ… पहा अक्षरधाम मंदिरातील फोटो

हे वाचलं का?

अक्षरधाम मंदिराचे संचालक ज्योतिंद्र दवे यांनी ‘आजतक’शी बोलताना सांगितले की, ऋषी सुनक यांनी आम्हाला दर्शन घ्यायचे असेल तर वेळ सांगा, असे सांगितले होते. मग आम्ही म्हणालो की, तुम्हाला वाटेल तेव्हा येऊ शकता. ते म्हणाले होते की, ‘मुख्य म्हणजे मला मंदिर बघायचे आहे.’

Maratha Reservation : तामिळनाडूत 59 टक्के आरक्षण, मग महाराष्ट्रात 50 टक्के मर्यादा का?

ADVERTISEMENT

अक्षरधाम मंदिराचे संचालक ज्योतिंद्र दवे यांनी सांगितले की, ‘इथे आल्यानंतर ऋषी सुनक यांनी मंदिरात आरती केली. संतांची भेट घेतली. यावेळी त्यांनी सर्व देवतांच्या मूर्तीसमोर फुले वाहिली. त्यांच्या पत्नी अक्षता सुनक यांनीही यावेळी दर्शन घेतले.

ADVERTISEMENT

G20 Summit : भारत-मध्य पूर्व-युरोप कनेक्टिव्हिटी कॉरिडॉरमुळे चीनचं वाढणार टेन्शन?

ऋषी सुनक म्हणाले की, ‘मला जेव्हा-जेव्हा संधी मिळेल, तेव्हा मी येत राहीन.’ त्यांनी मुख्य मंदिरात वेळ घालवला. त्यांनी मंदिर परिसरात अनवाणी पायांनी फेरफटका मारला. रिसेप्शनजवळ त्यांनी शूज ठेवले होते.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT