Chandrayaan-3 : चंद्रयान यशस्वी झेपावले! पण ‘हे’ धोकादायक अडथळे पार करणार का?
भारताने 14 जुलैला श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून चांद्रयान-3 चंद्राच्या दिशेने पाठवले होते. हे अंतराळ यान आता 42 दिवसांनी चंद्रावर पोहोचवणार आहे. पण या 42 दिवसांच्या कालावधीत चांद्रयान-3 समोर अनेक अडथळे येणार आहेत.
ADVERTISEMENT
भारताने 14 जुलैला श्रीहरिकोटा (shriharikota) येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून (satish dhavan space center) चांद्रयान-3(Chandrayaan-3) चंद्राच्या दिशेने पाठवले होते. हे अंतराळ यान आता 42 दिवसांनी चंद्रावर पोहोचवणार आहे. पण या 42 दिवसांच्या कालावधीत चांद्रयान-3 समोर अनेक अडथळे येणार आहेत. या अडथळ्यांना पार करत चंद्रयान 3 चंद्रावर पोहोचणार आहे. त्यामुळे नेमक्या चांद्रयान-3 समोर कोणते अडथळे असणार आहेत? हे जाणून घेऊयात. (chandrayaan 3 will it face on the way to reach the moons surface sriharikota satish dhawan space center)
ADVERTISEMENT
पहिला अडथळा
चंद्रयान 3 च्या समोर जो पहिला अडथळा असणार आहे, तो अडथळा म्हणजे गुरुत्वाकर्षणासमोर (Gravity) टीकणे. सेटेलाईट किंवा स्पेसक्राफ्टला गुरुत्वाकर्षणाच्या विरूद्ध जायचे असते. कारण गुरुत्वाकर्षण त्यांना रोखण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे चंद्रयान 3 ला गुरुत्वाकर्षण टाळण्यासाठी ताशी किमान 40,233 किलोमीटरचा वेग असावा लागतो.
दुसरा अडथळा
चंद्रयान 3 समोर जी दुसरी अडचण असणार आहे, ती म्हणजे पृथ्वीच्या वातावरणाच्या आणि चुंबकीय क्षेत्राच्या सुरक्षा कवचच्या बाहेर अंतराळात प्रकाशाच्या वेगाने सबटॉमिक कण फिरतात, याला रेडिएशन म्हणतात. त्यामुळे जेव्हा एखादा कण सेटेलाईटवर आदळतो, तेव्हा तो तुटतो. आणि त्यातून निघणारे कण दुय्यम रेडिएशन निर्माण करतात.याचा सेटलाईट किंवा स्पेसक्राफ्टवर मोठा परीणाम होतो.
हे वाचलं का?
हे ही वाचा : Chandrayaan-3: चंद्रयान चंद्रावर का जाऊ शकत नाही, पृथ्वीभोवती घिरट्या का घालतंय…
तिसरा अडथळा
तिसरा अडथळा म्हणजे..सुर्य कधीच शांत बसत नाही, तो आग ओकत असतो. यामधून निघणारे चार्ज्ड पार्टिकल्स म्हणजेच कण हे सेटेलाईट किंवा स्पेसक्राफ्टला नष्ट करू शकतात. तसेच सौर वादळामुळे उपग्रह खऱाब होऊ शकतो आणि त्याचा स्फोटही होऊ शकतो. सेटेलाईटवर सुरक्षा कवच बसवलेले असले तरीही हे कण सुरक्षा कवच खराब करू शकतात.
चौथा अडथळा
चौथा अडथळा म्हणजे…अवकाशातील धुल (स्पेस डर्स्ट), याला कॉस्मिक डस्टही म्हणतात. ही धुळ जेव्हा स्पेसक्राफ्टला धडकते तेव्हा ती प्लाझ्मामध्ये बदलते. अतिवेग आणि टक्करमुळे ही घटना घडते. या घटनेमुळे सेटेलाईटचे नुकसानही होऊ शकते किंवा ते अर्धवटरीत्या काम करणे बंदही करू शकते.
ADVERTISEMENT
पाचवा अडथळा
पाचवा अडथळा म्हणजे…चंद्रयान अवकाशातील इतर मानवी सेटेलाईट, उल्का किंवा अंतराळातील दगडांना ठोकर मारण्याचा धोका असतो. गेल्या काही वर्षापासून अवकाशात सेटेलाईटची संख्या वाढली आहे.खासकरून त्या सेटेलाईटची जे आता निष्क्रीय झाले असून देखील पृथ्वीच्या घिरट्या घालतायत. त्यामुळे या सेटेलाईटचा चंद्रयान 3 ला धोका होता आहे. कारण 2009 साली इरिडियम उपग्रह अशाच एका अवकाशातील ढिगाऱ्याशी टक्कर होऊन उद्ध्वस्त झाला होता.
ADVERTISEMENT
हे ही वाचा :LIVE: Chandrayaan 3: भारताचं चंद्रयान 3 लाँचिंग, पाहा याचि देही याचि डोळा…
सहावा धोका
चंद्रयानला सहावा धोका चुकीच्या कक्षेत जाण्याचा आहे. जर चंद्रयान 3 चुकीच्या कक्षेत गेले तर ते दुरूस्त करण्यासाठी बराच वेळ, क्षमता आणि ताकद लागेल. अशा घटनामुळे मिशनच्या टाईम टेबलवर आणि खर्चावर परीणाम होतो. सेटेलाईटचे इंधन कमी होते, जेणेकरून मिशन लवकर संपुष्टात येते आणि सेटेलाईट बेपत्ता होण्याचाही धोका असतो.
सातवा अडथळा
चंद्रयान 3 च्या या लांब प्रवासा दरम्यान गती, घटत-वाढत तापमान,रेडिएशन या सर्वांचा परीणाम होऊ शकतो. ज्यामुळे पेलोड किंवा उपकरणे खराब होण्याची शक्यता आहे. यामुले त्याचा पृथ्वीशी संपर्कही तुटू शकतो.
आठवा अडथळा
चंद्रयान 3 च्या वाटेतला आठवा अडथळा म्हणजे, आकाशात दिवसा तापमान 100 डिग्री सेल्सिअसच्या वर असते, तर रात्री हेच तापमान मायनस 100 डिग्री खाली येते. त्यामुळे जर चंद्रयान 3 यान तापमानातील हा बदल सहन करू शकला नाही, तर तो खराब होण्याची शक्यता आहे.
दरम्यान या 8 अडथळ्यांना पार करून चंद्रयानला चंद्रावर पोहोचायचे आहे. आता हे आव्हान पुर्ण करून चंद्रयान चंद्रावर पोहोचतो का? हे येणाऱ्या काळात समोर येणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT