Santosh Banger : शिंदेंच्या आमदारावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
Santosh Banger News : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आज 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आमदारांची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. असे असतानाच शिंदेंचे आमदार संतोष बांगर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
संतोष बांगर यांच्यावर गुन्हा दाखल
कळमनुरी पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल
संतोष बांगर यांनी वादग्रस्त विधान केलं होतं.
Santosh Banger News : ज्ञानेश्वर पाटील, हिंगोली : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आज 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आमदारांची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. असे असतानाच शिंदेंचे आमदार संतोष बांगर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कळमनुरी पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सूरू आहे. (eknath shinde mla a case has been register against santosh banger phone pay statement kalamanuri police station)
ADVERTISEMENT
दोन दिवसापूर्वी कळमनुरी येथे एका आयोजित कार्यक्रमात आमदार संतोष बांगर यांनी वादग्रस्त विधान केलं होतं. परगावी असणाऱ्या मतदारांना मतदानादिवशी आपल्याकडे बोलवा. त्यांना 'फोन पे' करा, त्यांची सोय करा, असे विधान बांगर यांनी केलं होतं. ही बातमी मुंबई तक वर प्रसारीत झाल्यानंतर निवडणूक विभागाकडून या वक्तव्या संदर्भात शिवसेना आमदार संतोष बांगर यांना नोटीस बजावत खुलासा मागवण्यात आला होता.त्याचबरोबर या व्हिडीओची चौकशी देखील करण्यात आली होती.त्यानंतर सहाय्यक गट विकास अधिकारी यांच्या तक्रारीवरून आमदार संतोष बांगर यांच्यावर कळमनुरी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीवरून संतोष बांगर यांच्यावर कळमनुरी पोलीस स्टेशनं मध्ये 364/2024कलम 170(1)(1),173 भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे ही वाचा : BJP Candidates List: सर्वात मोठी बातमी! भाजपची पहिली यादी जाहीर, 99 उमेदवारांची नावं वाचा एका क्लिकवर
बाहेरगावी असणाऱ्या कार्यकर्त्यांची यादी दोन दिवसांत आली पाहिजे. त्यांना आणण्यासाठी गाड्या करा. त्यासाठी काय लागतं ते सांगा. तुम्ही त्यांना जे लागेल तसं 'फोन पे' करून द्या. अशा सूचना बांगर यांनी दिल्या आहेत. त्यांचे हे मत मतदारांना आमिष असल्याने त्यांच्यावर निवडणूक आयोगाने कारवाई करावी, अशी मागणी केली जात होती. त्यानुसार अखेर त्यांच्यावर कारवाई झाली आहे.
हे वाचलं का?
हे ही वाचा : Constituency Wise BJP Candidates List: घाटकोपर पश्चिममधून भाजपने दिलं 'या' दिग्गज नेत्याला तिकीट, तिसऱ्यांदा हॅट्ट्रिक करण्याची संधी?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT