Reduce belly Fat : कंबरेवरचा घेर होईल झटपट कमी, दररोज करा ‘ही’ योगासने

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

health tips reduce belly fat yoga poses love handle tire belly fat bye using this yoga poses
health tips reduce belly fat yoga poses love handle tire belly fat bye using this yoga poses
social share
google news

Reduce belly Fat Yoga Poses :  सध्याच्या बैठ्या जीवनशैलीमुळे आणि तासनतास कम्प्युटरवरील कामकाजामुळे अनेकांच्या कंबरेचा घेर वाढत चालला आहे.हा घेर इतका वाढतो की पुढे जाऊन त्याचा टायर फॅट तयार होतो. या टायर फॅटमुळे तुम्ही तुमचे टाईट कपडे घालणे बंद करता. कारण त्यामधून तुमच्या शरीराची चरबी दिसते. अशा अवस्थेत जर तुम्हालाही तुमच्या कंबरेवरची चरबी कमी करायची आहे, तर आम्ही तुम्हाला काही योगासने सांगणार आहोत. ही योगासने केल्याने तुमच्या कंबरेचा घेर कमी होण्यास मदत होणार आहे. (health tips reduce belly fat yoga poses love handle tire belly fat bye using this yoga poses)

ADVERTISEMENT

परिघासन

कंबरेवरची चरबी कमी करण्यासाठी योगासनाचा हा खुप फायदेशीर प्रकार आहे. हे तुमच्या ओटीपोटाच्या स्नायूंना टोनिंग करून तुमचे ओटीपोटाचे स्नायू, आतील मांड्या, हॅमस्ट्रिंग आणि मणक्यांना बळकट करण्यास आणि ताणण्यास मदत करतात.

परिघासन करण्यासाठी सर्वप्रथम, योगा मॅटवर गुडघे वाकवून उभे राहा आणि गुडघ्यांमध्ये थोडे अंतर ठेवून डावा पाय डाव्या बाजूला हलवा. हे करताना पाय पूर्णपणे उघडे ठेवा आणि पायाचे तळवे जमिनीवर ठेवा.

हे वाचलं का?

हे ही वाचा : Rule Change : 1 डिसेंबरपासून ‘हे’ नियम बदलले, सर्वसामान्यांच्या खिशावर काय होणार परिणाम ?

आता दीर्घ श्वास घेऊन डाव्या पायावर डावा हात ठेवा. हे करत असताना, दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडत रहा. आपला उजवा हात वर करा आणि डावीकडे घ्या. तुमचे डोके आणि शरीराचा भाग उजवीकडे आणि कललेला असावा. सुमारे 30 ते 40 सेकंद या स्थितीत रहा आणि दीर्घ श्वास घेत रहा.

काही वेळाने, जुन्या स्थितीत परत येण्यासाठी, उजवा हात सरळ करा आणि डाव्या पायाचा गुडघा वाकवताना दोन्ही गुडघे जवळ आणा. दुसऱ्या पायानेही हीच प्रक्रिया पुन्हा करा.

ADVERTISEMENT

वशिष्ठासन

वसिष्ठासन केल्याने कंबरेभोवतीची चरबी कमी होते आणि शरीरात संतुलन आणि स्थिरताही राहते. हा योग नितंब आणि पाठीचा कणा मजबूत ठेवण्यास मदत करू शकतो.

ADVERTISEMENT

वसिष्ठासन करण्यासाठी सर्वप्रथम दंडासनाच्या आसनात योगा मॅटवर बसा आणि दोन्ही हात जमिनीवर ठेवून कंबर वाकवण्याचा प्रयत्न करा. यानंतर, तुमचे दोन्ही पाय मागे घ्या आणि शरीराचे वजन बोटांवर आणि पायाच्या बोटांवर ठेवा, त्यांना सरळ ठेवा.

आता तुमच्या शरीराचे वजन उजव्या हातावर ठेवा आणि डावा हातवर उचला. या दरम्यान तुम्हाला तुमचा सरळ पाय वरच्या दिशेने हलवावा लागेल. आता श्वास घेताना डावा हातवरच्या दिशेने सरळ ठेवा. जेणेकरून तुमचे दोन्ही हात सरळ रेषेत असतील. काही सेकंद या स्थितीत राहिल्यानंतर, श्वास सोडा आणि सामान्य स्थितीत परत या.

हे ही वाचा : ‘राजीनामा परत घेण्यासाठीचं आंदोलन पवारांच्याच आदेशावरून’, अजित पवारांचा खळबळजनक खुलासा

उत्कटासन

उत्कटासनाचा सराव केल्याने घोट्या, मांड्या आणि मणक्याची ताकद टिकून राहते आणि शरीराच्या वरच्या भागावर दबाव येतो, त्यामुळे कंबरेच्या बाजूची चरबी कमी होऊ लागते.

उत्कटासन करण्यासाठी सर्वप्रथम योग मॅटवर सरळ उभे राहून दोन्ही पाय पसरून हात पुढे करा. हे करत असताना तळवे खाली ठेवा. आता आपले हात आणि कोपर सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा.

यानंतर खाली बसण्याचा प्रयत्न करा. जसे तुम्ही खुर्चीवर बसता. हे करत असताना पाठीचा कणा पूर्णपणे सरळ ठेवा. काही वेळ या आसनात राहून नंतर सामान्य व्हा.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT