Maharashtra Weather Forecast : धो धो बरसणार! पुण्यासह 'या' जिल्ह्यांना 'रेड अलर्ट'

मुंबई तक

ADVERTISEMENT

पुणे, सातारा जिल्ह्याला रेड अलर्ट, कोकणाला ऑरेंज अलर्ट.
महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यांना रेड अलर्ट

point

कोकणतील तिन्ही जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज

point

मुंबई, ठाणे, नाशिकमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज

Weather update maharashtra : राज्यात सोमवारपासून (29 जुलै) पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस होत आहे. तर काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस होत आहेत. पुढील 24 तासांत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार असून, पुण्यासह काही जिल्ह्यांना रेड अलर्ट, तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. (IMD issues Red alert for Maharashtra including pune, satara, raigad, Ratnagiri, Sindhudurg)

ADVERTISEMENT

अरबी समुद्रावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्याचा वेग वाढला असून, त्याचा परिणाम म्हणून पश्चिम घाट आणि किनारपट्टी भागात अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

पुणे, साताऱ्यासाठी 24 तास महत्त्वाचे 

पश्चिम घाटालगत असलेल्या पुणे जिल्हा आणि सातारा जिल्ह्यासाठी पुढील 24 तास महत्त्वाचे असणार आहेत. हवामान विभागाने दोन्ही जिल्ह्यातील काही भागात अतिमुसळधार ते अतिवृष्टी सदृश्य पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला आहे. पुणे आणि सातारा जिल्ह्यासाठी आयएमडीने रेड अलर्ट दिला आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणाही सज्ज झाल्या आहेत.

हे वाचलं का?

हेही वाचा >> लाडकी बहीण योजनेत मोठी अपडेट, 'त्या' महिलांना मिळणार मोठा दिलासा 

कोकणाला ऑरेंज अलर्ट 

कोकण किनारपट्टीला लागून असलेल्या तिन्ही जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात जोरदार पाऊस होईल. आयएमडीने तिन्ही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. 

मुंबई, ठाणे, नाशिक, मराठवाडा, विदर्भात कसे असेल हवामान?

सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर हे चार जिल्हे वगळता महाराष्ट्राच्या इतर भागात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे. काही भागात गडगडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे. 

ADVERTISEMENT

हेही वाचा >> जयंत पाटील अडकणार? फडणवीसांना पत्र, राजकीय वर्तुळात खळबळ

मुंबई शहर आणि उपनगरामध्ये मध्यम ते मुसळधार पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. ठाणे, पालघरसह मुंबईला यलो अलर्ट दिला गेला आहे. त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. 

ADVERTISEMENT

IMD Alert for maharashtra including pune, satara, mumbai, konkan.
महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात कसे हवामान असेल, याबद्दल हवामान विभागाचा अंदाज.

मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. विशेषतः विदर्भातील भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT