Sachin Vaze : जयंत पाटील अडकणार? फडणवीसांना पत्र, राजकीय वर्तुळात खळबळ
Sachin Vaze Latest News : अँटिलिया स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेने थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
सचिन वाझेचे अनिल देशमुखांवर आरोप
देवेंद्र फडणवीस यांना दिले पत्र
फडणवीसांना दिलेल्या पत्रात जयंत पाटलांचेही नाव
Sachin vaze news : गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगला असून, यात आता सचिन वाझेने नवा लेटर बॉम्ब टाकला आहे. कथित 100 कोटी वसुली प्रकरणात सचिन वाझेने देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिले आहे, ज्यात जयंत पाटील यांच्या नावाचाही उल्लेख करण्यात आला आहे. (Sachin Vaze written a letter to Devendra Fadnavis in 100 crore extortion case)
अनिल देशमुख पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे -सचिन वाझे
सचिन वाझे म्हणाला की, "जे काही आहे, त्याचे पुरावे आहेत. सगळे पुरावे आहेत. पैसे त्यांच्या (अनिल देशमुख) पीएच्या माध्यमातून दिले जात होते. आणि सीबीआयकडेही पुरावे आहेत. मी अलिकडेच देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले आहे."
"सगळे काही त्यांच्या विरोधात गेलेले आहे. सगळे पुरावे त्यांना दिले आहेत. मी सर्व पुरावे पाठवले आहेत", असे वाझे म्हणाला.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
सचिन वाझेच्या पत्रात जयंत पाटलांचे नाव
त्यानंतर यात कुणाचे नाव आपण सांगू शकता का?, असा प्रश्न वाझे म्हणाला, "पत्र लिहिले आहे, त्यात जयंत पाटील यांचे नाव लिहिलेले आहे."
ADVERTISEMENT