कळवा रुग्णालयातील मृत्यूप्रकरणाची चौकशी होणार, CM शिंदेंनी काय दिले आदेश?
कळवा रुग्णालयातील मृ्त्यूप्रकरणाची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेऊन चौकशी समिती गठीत केली आहे.या समितीला संपूर्ण प्रकरणाचा अहवाल 48 तासात मुख्यमंत्र्यांना द्यायचा आहे, अशी माहिती ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली आहे.
ADVERTISEMENT
Chhatrapati Shivaji Maharaj Hospital Kalwa : ठाणे महापालिकेच्या कळवा रूग्णालयात (kalwa hospital) याआधी एकाच दिवशी 5 तर गेल्या 24 तासाच 18 रूग्णांचा मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली आहे. या घटनेनंतर आता महापालिका रूग्णालयाच्या कारभारावरून टीका होत आहे,तसेच या घटनेने राजकीय वातावरण देखील तापले आहे. या घटनेची गंभीर दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी घेऊन चौकशी समिती गठीत केली आहे.या समितीला संपूर्ण प्रकरणाचा अहवाल 48 तासात मुख्यमंत्र्यांना द्यायचा आहे, अशी माहिती ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली आहे. (kalwa hospital 18 patient death cm eknath shinde formed inquiry commitee)
ADVERTISEMENT
महापालिकेतील कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालयात याआधी 5 रूग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला होता. यानंतर आता शनिवारी रात्रीपासून रविवारी सकाळपर्यंत 24 तासात 18 रूग्णांचा मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली आहे. यामध्ये 8 पुरुष आणि 10 महिलांचा समावेश आहे.मृत्यू झालेल्यांमध्ये 6 लोक ठाणे शहर आणि जिल्हा परिसरात राहणारे आहेत, 4 कल्याणमधील, 3 भिवंडी येथील आहेत, तर उरलेले इतर ठिकाणाहूनही लोक आले आहेत.
हे ही वाचा : Sharad Pawar Ajit Pawar Meet: शरद पवार अजित पवारांचे मनोमिलन होणार? दिले संकेत
रूग्णालयात आलेल्या एकाने रॉकेल पिले होते, तर एकाला साप चावला होता, त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. “दोन रुग्ण असे होते की, त्यांची फुफ्फुस खराब झाले होते. त्यांचा संसर्ग होऊन मृत्यू झाला. तीन-चार रुग्ण असे होते की, मल्टि ऑर्गन डिसफंक्शनमुळे त्यांचा मृत्यू झाला. काही अनियंत्रित मधुमेह होता. काही ह्रदयाचा आजार होता. त्यामुळे हे रुग्ण मरण पावले”, असे रूग्णालय प्रशासनाने म्हटले आहे.
हे वाचलं का?
या सर्व प्रकरणाची दखल आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या आदेशानुसार आरोग्य सेवा आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीत ठाणे जिल्हा अधिकारीही सहभागी असणार आहेत. या घटनेतील नागरीकांचा मृत्यू कसा झाला? याची कारणे ही समिती शोधणार आहे. ही समिती नेमल्यानंतर 48 तासांत मुख्यमंत्र्यांनी अहवाल द्यायचा आहे, अशी माहिती अभिजीत बांगर यांनी दिली आहे.
हे ही वाचा : कोण आहे फरहीन फलक, जी ‘कराची टू नोएडा’ चित्रपटात दिसणार सीमा हैदरच्या भूमिकेत?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT