कोण आहे फरहीन फलक, जी 'कराची टू नोएडा' चित्रपटात दिसणार सीमा हैदरच्या भूमिकेत? - Mumbai Tak - who is model farheen falak karachi to noida seema haider - MumbaiTAK
बातम्या मनोरंजन

कोण आहे फरहीन फलक, जी ‘कराची टू नोएडा’ चित्रपटात दिसणार सीमा हैदरच्या भूमिकेत?

सीमा हैदरच्या लव्हस्टोरीवर चित्रपट बनवण्यात येणार असून, या चित्रपटात सीमा हैदरची भूमिका मॉडेल फरहीन फलक साकारणार आहे.
Many actors auditioned for the role of Seema Haider in the film. Model and actor Farheen Falak has been selected for the role of Seema Haider.

Karachi to Noida : पाकिस्तानातील कराचीहून भारतातील नोएडात आलेल्या सीमा हैदर आणि सचिन मीना यांची प्रेमकहाणी सध्या चर्चेत आहे. सीमा आणि सचिनच्या कथेवर ‘कराची टू नोएडा’ हा चित्रपट बनत आहे. जानी फायरफॉक्स प्रॉडक्शन हाऊसचे अमित जानी हा चित्रपट बनवत आहेत. याबाबत नोएडा येथे ऑडिशन्सही घेण्यात आल्या आहेत. या चित्रपटातील सीमा हैदरच्या भूमिकेसाठी अनेक कलाकारांनी ऑडिशन दिले होते. सीमा हैदरच्या भूमिकेसाठी मॉडेल आणि अभिनेत्री फरहीन फलकची निवड करण्यात आली आहे. (Who is model Farheen Falak)

प्रेमासाठी सगळं काही सोडून भारतात आलेल्या सीमा हैदरची कथा या चित्रपटात असणार आहे. त्याचबरोबर थरारक सस्पेन्स आणि स्पाय अँगल असणार आहे. या चित्रपटात सीमा हैदर रॉ एजंटच्या भूमिकेत दिसणार आहे. मॉडेल आणि अभिनेत्री फरहीन फलकला सीमा ही व्यक्तिरेखा मिळाली आहे. फरहीन फलकने जामिया विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे.

वाचा >> Kalwa Hospital : 18 रुग्णांचा मृत्यू कसा झाला? रुग्णालय प्रशासनाने सांगितली कारणे

फरहीनने यापूर्वी रणबीर कपूर आणि अजय देवगण यांसारख्या अभिनेत्यांसोबत काम केले आहे. फरहीन फलकने ‘टायगर जिंदा है’ चित्रपटात पाकिस्तानी अँकरची भूमिका साकारली होती. फरहीन फलक या चित्रपटात सीमा हैदरची भूमिका साकारणार आहे, मात्र सचिनची भूमिका कोण साकारणार हे अद्याप ठरलेले नाही.

सीमा हैदरलाही काम करण्याची आली ऑफर

सीमा हैदरलाही कराची ते नोएडा या चित्रपटात भूमिकेची ऑफर देण्यात आली होती, परंतु उत्तर एटीएसच्या तपासामुळे तिने थांबण्यास सांगितलं. सीमा हैदरने सांगितले की, आम्हाला जॉनी फिल्म प्रोडक्शनकडून ऑफर मिळाली आहे. जर आम्हाला यूपी एटीएसकडून क्लीन चिट मिळाली, तर मी त्यात काम करेन. यामुळे आम्हाला मदतच होईल. अमित जानी यांनी आपल्याला ऑफर दिली आहे, ती मी स्वीकारेन, मात्र आधी तपास पूर्ण होऊ देईल, असे सीमाने सांगितले.

चित्रपटाचा टीझर लवकरच होणार लाँच

चित्रपट निर्माते अमित जानी यांनी सांगितले की, सीमा आणि सचिनच्या प्रेमकथेवर बनवल्या जाणाऱ्या ‘कराची टू नोएडा’ या चित्रपटाच्या ऑडिशनसाठी 60 अभिनेत्री आणि कलाकार आले होते. या चित्रपटाबद्दल लोकांमध्ये उत्सुकता आहे.

वाचा >> मीरा रोड : मुलीचं प्रकरण… विद्यार्थ्याने शिक्षकावर रस्त्यावरच केले सपासप वार

लोकांना सचिन आणि सीमाची प्रेमकहाणी काय आहे हे जाणून घ्यायचे आहे. यामागे काही षडयंत्र आहे की फक्त खर्‍या प्रेमाची गोष्ट आहे? भारताविरुद्ध काही षडयंत्र आहे का? हे प्रश्न लोकांच्या मनात आहेत. समाजासमोर योग्य चित्र मांडणे हे चित्रपट निर्मात्याचे काम असते. म्हणूनच कराची ते नोएडा हा चित्रपट योग्य कथेवर बनवला जाईल. त्याचे टीझर लवकरच लाँच होईल, अशी माहिती जानी यांनी दिली.

सीमाचा पाकिस्तानी पती गुलाम हैदरही दिसणार

या चित्रपटात सीमाचा पती गुलाम हैदर यांचीही भूमिका असणार आहे. त्यामुळेच चित्रपट निर्मिती टीमने गुलाम हैदर यांना भारतात येण्याचे निमंत्रण दिले आहे, जेणेकरून सीमाची बाजूवरही चित्रीकरण करता येईल. अमित जानी म्हणाले की, सीमाबद्दल अधिकाधिक जाणून घेण्यासाठी आपल्या लेखकांना गुलाम हैदरची कथाही जाणून घ्यायची आहे. सीमाच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल आम्हाला त्याच्याकडून काही माहिती हवी आहे.

अमित जानी यांनी गुलाम हैदरला दिले भारत भेटीचे निमंत्रण

अमित जानी म्हणाले की, गुलाम हैदरला भारतात यायचे असेल तर त्याचे स्वागत आहे. सीमाच्या आयुष्याबद्दल तो आमच्याशी बोलायला तयार असेल तर तो व्हिसा घेऊन दिल्लीला येऊ शकतो. त्याला इथे यायचे नसेल, तर आम्ही आमचे चित्रपट लेखकही त्याच्याकडे पाठवू शकतो. त्याला हवे असल्यास तो पाकिस्तानचा टूरिस्ट व्हिसा घेऊन मुंबई किंवा दिल्लीलाही येऊ शकतो, जिथे तो आमच्या प्रॉडक्शन हाऊसमध्ये बसून सीमाच्या जीवनाबद्दल आमच्याशी चर्चा करू शकतो.

World Heart Day: तुम्हाला पण ‘ही’ लक्षणं दिसतायेत? वेळीच डॉक्टरांकडे जा, नाहीतर… Eknath Shinde : श्रीकांत शिंदे उतरले पाण्यात… मुख्यमंत्र्यांनी बाप्पाला कसा दिला निरोप? Priyanka Chopra: सुंदर दिसण्यासाठी सर्जरी केली अन् प्रियांका कशी फसली? Dengue : डेंग्यू झाल्यास ‘या’ गोष्टी अजिबात विसरू नका, एक चूक पडेल महागात Esha Gupta : आउटडोर शुटच्या बहाण्याने…, प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव Ganpati 2023: गणपती बाप्पासोबत ‘मोरया’ का म्हणतात? पितृ पक्ष उद्यापासून होणार सुरू! का आहे एवढं महत्त्व? Dengue food not to eat : डेंग्यू झाल्यानंतर हे पदार्थ अजिबात खाऊ नका! Rashmika Mandanna चा 6 वर्षांपूर्वी मोडला होता साखरपुडा, आता… बघावं ते नवलच! ‘या’ बाळालाही आली दाढी मिशी… कोहलीशी पंगा घेतला, खेळाडूचा 24 व्या वर्षी अचानक क्रिकेटमधून संन्यास लालबागचा राजा निघाला! भेटीसाठी मुंबईच्या रस्त्यावर भक्तांचा ‘महापूर’ आत्मविश्वास वाढवण्यासाठी महिलांनी ‘या’ टिप्स नक्की करा फॉलो! Ganpati Visarjan 2023: लालबागच्या राजाची थाटात मिरवणूक! बनला ‘चंदू चायवाला’ पण चमकलं असं नशीब की… Alia Bhatt ने वाढदिवसाला सांगितलं रणबीर कपूरचं सीक्रेट! Raveena Tandon चं करिअर करिष्मामुळे फ्लॉप? म्हणाली.. अभिनेत्रीला सेटवरून काढलं, लोकप्रिय होऊनही करावा लागला संघर्ष! रवीना-अक्षयचं झालं होतं ब्रेकअप? पहिल्यांदाच EX वर दिली प्रतिक्रिया Jio vs Airtel: सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान कोण देणार?