Govt Job: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी... इंजीनिअर ते ड्रायव्हर पदांसाठी बंपर भरती
ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टंट्स इंडिया लिमिटेड (BECIL) कडून विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. असिस्टंट इंजीनिअर, एक्झीक्यूटिव्ह इंजीनिअर, सिक्योरिटी ऑफिसर, मॅकेनिक आणि ड्रायव्हरसह एकूण 31 पदांसाठी अर्जाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

BECIL कडून विविध पदांसाठी भरती

इंजीनिअर ते ड्रायव्हर पदांसाठी बंपर भरती

कधीपर्यंत कराल अर्ज?
Govt Recruitment: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी भरतीचं नवीन नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलं आहे. ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टंट्स इंडिया लिमिटेड (BECIL) कडून विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. असिस्टंट इंजीनिअर, एक्झीक्यूटिव्ह इंजीनिअर, सिक्योरिटी ऑफिसर, मॅकेनिक आणि ड्रायव्हरसह एकूण 31 पदांसाठी अर्जाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवार 30 जुलै 2025 पर्यंत becil.com या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात.
काय आहे पात्रता?
BECIL च्या या भरतीसाठी वेगवेगळ्या पदांसाठी शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली आहे. असिस्टंट इंजीनिअर किंवा असिस्टंट स्टोर इंजीनिअर पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून मॅकेनिकल, इलेक्ट्रिकल किंवा सिव्हिल इंजीनियरिंगमध्ये ग्रॅज्यूएट डिग्री असणं आवश्यक आहे.
तसेच, ड्रायव्हर, मॅकेनिक आणि डिसेक्शन हॉल अटेंडंट सारख्या टेक्निकल किंवा सपोर्टिंग स्टाफच्या पदांसाठी किमान 10 वी किंवा 12 वी उत्तीर्ण पात्रता असणं अनिवार्य आहे.
किती मिळेल पगार?
या भरतीसाठी नियुक्त झालेल्या उमेदवारांना 19,000 रुपये ते 56,100 रुपये मासिक वेतन देण्यात येईल. पद आणि पात्रतेच्या आधारे वेतन निश्चित केलं जाईल. नियुक्त झालेल्या उमेदवारांचं वेतन सरकारी नियमांनुसार आधारित असून यामध्ये भविष्यात वाढ होण्याची देखील शक्यता असते.
हे ही वाचा: “मला कुटुंबापासून दूर जायचंय...” राधिकाची व्हॉट्सअॅप चॅट आली समोर! कोचला नेमकं काय सांगितलं?
अर्जाचे शुल्क
उमेदवारांना अर्ज करण्यासाठी शुल्क आकारण्यात येईल. जनरल (General), ओबीसी (OBC) आणि ईडब्ल्यूएस (EWS) प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 259 रुपये शुल्क भरावे लागेल. तसेच एससी (SC) आणि एसटी (ST) प्रवर्गातील उमेदवारांना अर्जाच्या शुल्कात सूट देण्यात आली असून त्यांना अर्जाची प्रक्रिया जवळपास मोफत आहे. ऑनलाइन माध्यमातूनच अर्जाचे शुल्क भरता येईल.
हे ही वाचा: तीन वर्षांपासून होतं जीवापाड प्रेम, बहिणीने चौकात सोडलं अन् तरुणी गायब, अखेर तरुणासोबत जंगलात...
कशी होईल निवड?
BECIL च्या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि कौशल्य चाचणी किंवा इंटरव्ह्यूच्या आधारे केली जाईल. यासाठी पात्र उमेदवारांना कॉल किंवा ईमेलच्या माध्यमातून मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल. त्यावेळी तारीख आणि ठिकाणाची माहिती सुद्धा देण्यात येईल. अर्ज केल्यानंतर योग्य प्रोफाइल असल्यास उमेदवारांना थेट मुलाखल किंवा स्किल असेसमेंट टेस्टसाठी बोलवण्यात येईल.