रात्री पत्नीसोबत झालं भांडण अन् सकाळी पतीसोबत घडला धक्कादायक प्रकार... नेमकं काय घडलं?

बिहारच्या कटिहार-सिलीगुडी रेलखंड येथील सुधानी रेल्वे स्टेशनजवळ एका तरुणाचा मृतदेह आढळला. संबंधित तरुणाचा मृतदेह रेल्वे रूळावर सापडला असल्याचं सांगण्यात येत आहे.

रात्री पत्नीसोबत झालं भांडण अन् सकाळी पतीसोबत घडला भलताच प्रकार...
रात्री पत्नीसोबत झालं भांडण अन् सकाळी पतीसोबत घडला भलताच प्रकार...
social share
google news

बातम्या हायलाइट

point

रात्री पत्नीसोबत झालं भांडण अन् सकाळी घडला धक्कादायक प्रकार

point

नेमकी घटना काय?

Crime News: बिहारच्या कटिहार-सिलीगुडी रेलखंड येथील सुधानी रेल्वे स्टेशनजवळ एका तरुणाचा मृतदेह आढळला. संबंधित तरुणाचा मृतदेह रेल्वे रूळावर सापडला असल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. प्रकरणातील मृताची ओळख मंटू शर्मा अशी समोर आलं आहे. पीडित तरुण आजमनगर पोलीस स्टेशन हद्दीतील दनिया गावाचा रहिवासी असल्याची माहिती आहे. अपघातामुळे तरुणाचा मृत्यू झाल्याचं स्थानिकांनी सांगितलं. स्थानिक लोकांच्या मते, मंटू शर्मा ट्रेनच्या खाली आल्याने त्याचा मृत्यू झाला. 

आदल्या दिवशी पत्नीसोबत भांडण

घटनेची माहिती मिळताच मृताचे कुटुंबीय घटनास्थळी पोहचले. त्यावेळी मृताच्या कुटुंबियांनी हा अपघात नसून हत्येची संशय व्यक्त केला. संबंधित प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस सुद्धा घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी मृतदेहाचं पोस्टमॉर्टम करून तो कुटुंबियांच्या ताब्यात दिला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत अद्याप कोणतीच लेखी तक्रार करण्यात आलेली नाही. मृताच्या सासरच्या मंडळींनी सांगितल्याप्रमाणे, घटनेच्या आदल्या दिवशी म्हणजेच गुरुवारी मंटूचं तिच्या पत्नीसोबत भांडण झालं होतं. 

हे ही वाचा: पतीच्या मित्रासोबतच गेली सासरी... पती संतापला अन् अनैतिक संबंधाच्या संशयातून घडली भयानक घटना!

शुक्रवारी मंटू सकाळी शौचासाठी घरातून बाहेर पडला असता तो घरापासून केवळ 500 मी अंतरावर असलेल्या रेल्वे रूळाजवळ पोहोचला. त्यावेळी चालत्या ट्रेनने धडक दिली आणि त्याचा एक पाय, एक हात आणि अर्धा डोकं कापण्यात आलं. यामध्ये त्याचा मृत्यू झाल्याचा स्थानिकांनी दावा केला. 

आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज 

घटनेच्या 24 तास आधी मंटूला मारहाण करण्यात आली असल्याचं मंटूच्या भावाने सांगितलं. यावरून हे हत्येचं प्रकरण असल्याचं दिसून येत आहे. सध्या, पोलीस या घटनेचा तपास करत असून संबंधित तरुणाने आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मृताच्या कुटुंबियांनी केलेल्या औपचारिक तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आहे. 

हे ही वाचा: नागरिकांनो सावधान! गटारीच्या पाण्यात भाज्या धुवून विक्री... धुळ्यातील भाजीविक्रेत्याचा किळसवाणा प्रकार

पोलीस या प्रकरणामागचं नेमकं कारण शोधण्याच्या प्रयत्नात असल्याचं सांगितलं जात आहे. मंटूचा मृत्यू नेमका कसा झाला? हे शोधण्यासाठी पोलीस पोस्टमॉर्टम रिपोर्टच्या प्रतिक्षेत आहेत. मंटूच्या पत्नीचं नाव लक्खी कुमारी असून त्यांना दोन मुलं असल्याची माहिती आहे. 


 

हे वाचलं का?

    follow whatsapp