नागरिकांनो सावधान! गटारीच्या पाण्यात भाज्या धुवून विक्री... धुळ्यातील भाजीविक्रेत्याचा किळसवाणा प्रकार
सध्या, भाजीविक्रेता गटारातील पाण्याने भाजी धुवून विकत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल होत असल्याचं पाहायला मिळतंय. हा व्हिडिओ धुळ्यातल्या शिवतीर्थ चौकातील असल्याचं समोर आलं आहे.

बातम्या हायलाइट

गटारीच्या पाण्यात भाज्या धुवून विक्री...

धुळ्यातील भाजीविक्रेत्याचा किळसवाणा प्रकार
Viral Video: पावसाळ्याच्या ऋतूत रस्त्याच्या कडेला भाजीविक्रेत्यांकडून भाज्या विकत घेताना त्यांच्या स्वच्छतेबद्दल अनेकांच्या मनात संशय येत असतो. बऱ्याचदा अशा काळात विक्रेते सर्वसामान्य नागरिकांना स्वस्तात भाजी विकत असल्याचं आपण पाहतो. परंतु, आरोग्यासाठी फायदेशीर असलेल्या या भाज्या आरोग्यासाठी अपायकारक ठरू शकतात. सध्या, भाजीविक्रेता गटारातील पाण्याने भाजी धुवून विकत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल होत असल्याचं पाहायला मिळतंय. हा व्हिडिओ धुळ्यातल्या शिवतीर्थ चौकातील असल्याचं समोर आलं आहे.
गटारीच्या पाण्यामध्ये भाजी धुवून विक्री...
धुळे शहरातील साक्री रोड परिसरात असलेल्या शिवतीर्थ जवळ काही भाजी विक्रेते भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात. याच शिवतीर्थ लगत असलेल्या अस्वच्छ आणि गटारीच्या पाण्यामध्ये भाजी विक्रेत्याने भाजी धुवून विक्रीसाठी ठेवली असल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. भाजीपाला विक्रेत्याचा हा प्रकार पाहू सर्वसामान्यांमध्ये संतापची लाट उसळली आहे.
हे ही वाचा: पवित्र रिश्ता फेम मराठीमोळी अभिनेत्री 'प्रिया मराठे'चं निधन
आरोग्याच्या दृष्टीने मोठी चिंता
या व्हिडीओमुळे अशा भाजीविक्रेत्यांकडून आरोग्य धोक्यात टाकून भाजीपाला विकत घेणे किती योग्य आहे? असा सवाल सर्वसामान्य नागरिकांकडून केला जात असल्याचं पाहायला मिळतंय. भाजीविक्रेता ग्राहकांच्या आरोग्याशी कशाप्रकारे खेळ करतोय? हे या व्हिडिओतून दिसून आलं आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर, नागरिकांमध्ये आरोग्याच्या दृष्टीने मोठी चिंता निर्माण झाली आहे.
हे ही वाचा: Manoj Jarange Patil : ‘फडणवीसनं दोन खून केलेत’, जरांगे-पाटलांची स्फोटक मुलाखत
नागरिकांना केलं आवाहन...
गटाराच्या पाण्यात बऱ्याच प्रकारचे जंतू आणि विषारी घटक असतात, जे मानवी शरीरासाठी अत्यंत हानिकारक ठरू शकतात. अशा दूषित पाण्यात धुतलेल्या भाज्या खाल्ल्यास गंभीर आजार होण्याची शक्यता असतानाही कित्येकदा काही भाजी विक्रेते असला किसळवाणा प्रकार करताना पाहायला मिळतं. भाजी विक्रेत्याच्या या गलिच्छ प्रकारामुळे सर्व सामान्य नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला असून नागरिकांनी भाजी खरेदी करताना खात्री करूनच खरेदी करण्याचा आवाहन केलं जात आहे. पावसाळ्याच्या दिवसात नागरिकांनीभाजी खरेदी करताना ती स्वच्छ आणि सुरक्षित ठिकाणी धुतली आहे याची खात्री करूनच खरेदी करावी, असा सल्ला देण्यात येत आहे.