पवित्र रिश्ता फेम मराठमोळी अभिनेत्री 'प्रिया मराठे'चं निधन

मुंबई तक

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रिया मराठे हिचे वयाच्या 38 व्या वर्षी कॅन्सरमुळे निधन झाल्याची दु:खद बातमी समोर आली आहे.

ADVERTISEMENT

पवित्र रिश्ता फेम मराठीमोळी अभिनेत्री 'प्रिया मराठे'चं निधन
पवित्र रिश्ता फेम मराठीमोळी अभिनेत्री 'प्रिया मराठे'चं निधन
google news

बातम्या हायलाइट

point

मराठीमोळी अभिनेत्री 'प्रिया मराठे'चं निधन

point

सुप्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री प्रिया मराठेचं निधन...

Actress Priya Marathe Death: सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रिया मराठे हिचे वयाच्या 38 व्या वर्षी कॅन्सरमुळे निधन झाल्याची दु:खद बातमी समोर आली आहे. आज दुपारी 4 वाजता मिरारोडला अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

लहानपणापासूनच शिक्षणाची अनेक स्वप्ने रंगवली...

हसऱ्या चेहऱ्याच्या या गोड अभिनेत्रीचा जन्म 23 एप्रिल 1987 रोजी प्रिया मराठेचा ठाण्यात जन्म झाला होता. प्रिया अभ्यासामध्ये हुशार होती. तिने लहानपणापासूनच शिक्षणाची अनेक स्वप्ने रंगवली होती. तिला ही त्यावेळी इतरांप्रमाणे इंजिनिअर, डॉक्टर व्हायचं होत. परंतु, आपण कधी अभिनयाकडे वळू असे तिला स्वप्नात ही वाटले नव्हते. तिने तिचे शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर ठाणे कॉलेजला प्रवेश घेतला. अकरावीत असतानाच तिचा महाविद्यालयातल्या एकांकिका स्पर्धा, नाट्यस्पर्धा यांच्याशी संबंध आला होता. तिने हे सर्व जवळून पाहिलं होत. नाटकांच्या तालिमा आणि स्पर्धांना ती उपस्थित असायची. त्याच दरम्यान ती अभिनयाकडे आकर्षित झाली होती.

प्रवासाला एक वेगळी दिशा 

त्यानंतर अकरावीत असल्यापासून अभ्यासाच्या जोडीने तिचा अभिनयाचा वेगळा प्रवास सुरू झाला. त्यानंतर पदवीच्या पहिल्या वर्षाला असताना प्रियाची आणि महाविद्यालयातल्या इतर नाट्यप्रेमींची ओळख झाली आणि तिच्या प्रवासाला एक वेगळी दिशा मिळाली. दिग्दर्शक रवी करमरकर, विजू माने, संतोष सराफ, लेखक शिरीष लाटकर या दिग्गज मंडळींचे प्रियाला त्यावेळी मार्गदर्शन मिळाले होते.

टेलिव्हिजन विश्वात पदार्पण

प्रियाने 2005 मध्ये ‘या सुखांनो या’ या मराठीतील गाजलेल्या मालिकेतून छोट्या पडद्यावर श्रीगणेशा केला होता. या मालिकेनंतर प्रियाने मागे वळून पाहिले नाही. कारण, त्यानंतर तिला अनेक मालिकांमध्ये भूमिका साकारण्याची संधी मिळाली होती. मिळवला. 2005 साली मराठी मालिकेतून आपल्या व्यावसायिक अभिनयाचा श्रीगणेशा केलेल्या प्रियाने नंतर कधी मागे वळून पाहिलं नाही. ‘चार दिवस सासूचे’ सारख्या दर्जेदार मालिकेतही तिने तिच्या अभिनयाचा ठसा उमटवला होता.एका बाजूला मराठी मालिकांमध्ये काम करत असतानाचा प्रियाला अनेक संधी मिळू लागल्या होत्या. अशातच तिला हिंदी इंडस्ट्रीमध्ये प्रवेश करण्याची मोठी संधी चालून आली. 2007 मध्ये टेलिव्हिजन विश्वाची क्वीन निर्माती एकता कपूरच्या ‘कसम से’ मालिकेतून प्रियाने हिंदी टेलिव्हिजन विश्वात पदार्पण केले होते. या मालिकेतील तिची भूमिका ही चांगली गाजली.

हे वाचलं का?